Sahara India Refund Portal Saamtv
बिझनेस

Sahara India Refund Portal: गुंतवणुकदारांना मोठा दिलासा! सहारात अडकलेले पैसे परत मिळणार; काय करावं लागेल? जाणून घ्या

सहारा समूह सहकारी संस्थांच्या 10 कोटी ठेवीदारांना त्यांचे पैसे वसूल करण्यात मदत होईल असा सरकारचा उद्देश आहे.

Gangappa Pujari

Sahara Investment Refund: सहारामध्ये तुमचे पैसे अडकले असतील तर एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने मंगळवारी (18 जुलै) CRCS-सहारा रिफंड पोर्टल सुरु केले. या पोर्टरद्वारे सहारा समूह सहकारी संस्थांच्या 10 कोटी ठेवीदारांना त्यांचे पैसे वसूल करण्यात मदत होईल असा सरकारचा उद्देश आहे.

ज्या गुंतवणूकदारांची गुंतवणूक परिपक्वता पूर्ण झाली आहे त्यांनाच पैसे परत केले जातील. सुरुवातीला 10-10 हजार रुपये गुंतवणूकदारांना परत केले जातील. परताव्याचा दावा करण्यासाठी गुंतवणूकदारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाहीत, असेही केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, केंद्र सरकारच्या याचिकेवर 29 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने सहारा-सेबी रिफंड खात्यात पडून असलेले 5000 कोटी रुपये सहकारी संस्थांच्या केंद्रीय निबंधकांकडे (CRCS) हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले होते. आता हे पाच हजार कोटी रुपये पहिल्या टप्प्यात गुंतवणूकदारांना परत केले जातील.

ज्या गुंतवणूकदारांनी सहारा क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सहारायन युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी लिमिटेड, हमारा इंडिया क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आणि स्टार्स मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडमध्ये गुंतवणूक केली आहे त्यांना हे पैसे दिले जातील.

एकाच अर्जात करा सर्व मागण्या..

जर एखाद्या गुंतवणूकदाराने सहाराच्या एकापेक्षा जास्त सहकारी संस्थांमध्ये गुंतवणूक केली असेल, तर त्याला परतावा मिळविण्यासाठी पोर्टलवर उपलब्ध रिफंड फॉर्ममध्ये त्याचे सर्व दावे दाखल करावे लागतील.

सहारा ग्रुप ऑफ को-ऑपरेटिव्ह सोसायटी दावा अर्ज सादर केल्याच्या 30 दिवसांच्या आत सत्यापित करेल. क्लेम स्टेटसची माहिती पोर्टलवर क्लेम फॉर्म भरल्यानंतर १५ दिवसांनंतर एसएमएसद्वारे किंवा पोर्टलवर दिली जाईल. दावा प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 45 दिवस लागू शकतात.

असा करा अर्ज...

1.परतावा मिळवण्यासाठी तुम्ही प्रथम CRCS-Sahara रिफंड पोर्टलवर(https://mocrefund.crcs.gov.in/Depositor/Register) नोंदणी करा.

2. नोंदणीसाठी आधारचे शेवटचे चार क्रमांक आणि आधारशी लिंक केलेला तुमचा मोबाइल क्रमांक प्रविष्ट करा.

3. त्यानंतर OTP वर क्लिक करा. तुमच्या मोबाईल नंबरवर OTP येईल, जो भरा. यानंतर तुम्हाला फॉर्म मिळेल.

4. ऑफलाइन फॉर्म डाऊनलोड केल्यानंतर तो भरा, स्कॅन करा आणि पोर्टलवर अपलोड करा. 5. तुम्ही दिलेल्या माहितीची पडताळणी केल्यानंतर परताव्याची रक्कम तुमच्या खात्यावर पाठवली जाईल.

किती असेल फी?

पैसे परत मिळविण्यासाठी, सहकार मंत्रालयाच्या वेबसाइटवर (https://cooperation.gov.in) दिलेल्या CRCS-सहारा रिफंड पोर्टलच्या लिंकवर क्लिक करून पोर्टलवर लॉग इन करावे लागेल. परतावा मिळविण्यासाठी गुंतवणूकदारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT