Salary Hike In Private Sector google
बिझनेस

Salary Hike: आनंदाची बातमी! 2025 मध्ये खासगी कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढ, मर्सरचा अहवाल

Salary Hike In Private Sector: सरकारी कर्मचाऱ्यांनंतर आता खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे खासगी क्षेत्रातील नोकरदार मालामाल होणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तेजल नागरे, साम प्रतिनिधी

एप्रिल महिना जवळ येतोय आणि आता सर्व कर्मचाऱ्यांना ओढ लागली आहे ती पगारवाढीची. वर्षभर केलेल्या कामाचं फलित म्हणजेच पगारवाढ यंदा किती असेल या संदर्भात अहवाल समोर आलाय. पाहुयात यावरचाच स्पेशल रिपोर्ट. खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना गेल्या पाच वर्षात समाधानकारक वेतवाढ मिळत असल्याचे चित्र दिसतंय.

यंदा म्हणजे २०२५ मध्येही खासगी कर्मचाऱ्यांना चांगली वेतनवाढ मिळेल असा अंदाज मनुष्यबळ सल्लागार संस्था मर्सरने या सर्वेक्षणात मांडलाय.यावर्षी खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ९.४ टक्के पगारवाढ मिळणार असल्याचा अंदाज आहे. तंत्रज्ञान, ग्राहकोपयोगी वस्तू, वित्तीय सेवा, ऑटोमोटिव्ह, अभियांत्रिकी, सेवा क्षेत्र अशा विविध क्षेत्रातील साधारण 1550 हून अधिक कंपन्यांनी सर्वेक्षणात सहभाग नोंदवला. त्यानुसार या अहवालात नक्की काय म्हटलंय पाहुयात.

यंदा 10 % पगारवाढ ?

गेल्या पाच वर्षात साधारण 8% पगारवाढ होतेय.

2025 मध्ये 9.4 % पगारवाढीचा अंदाज

ऑटोमोबाईल क्षेत्रात सर्वाधिक 10 % पगारवाढीचा अंदाज

मेक इन इंडिया या उपक्रमामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रात सर्वाधिक वाढ

2025 मध्ये 37% संस्था कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणार

कर्मचारी कपात 11.9 टक्क्यांवर स्थिर राहणार

पगारवाढीसोबत अनेक कंपन्या नवीन कर्मचारी रुजू करून घेण्याच्या तयारीत आहेत...नवीन कर्मचाऱ्यांमध्येही कंपन्या फ्रेशर्सना सर्वाधिक पसंती देत आहेत. आणि फेशर्सना आकर्षित करण्य़ासाठी कंपन्या नक्की काय करतायत पाहुयात.

कंपन्यांची फेशर्सना पसंती

गुणवत्तेच्या आधारावर घसघशीत पॅकेज

उत्तम प्रशिक्षण

अपस्किलिंगसाठी प्रोत्साहन

प्रभावी कामासाठी वाढीव वेतन

त्यामुळे नव्या कर्मचारी भरतीसह जून्या कर्मचाऱ्यांना चांगली पगारवाढ असेल असेच चित्र मनुष्यबळ सल्लागार संस्था मर्सरने केलेल्या सर्वेक्षणात दिसतेय...त्यामुळे यंदाचे वर्ष खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आर्थिक दृष्ट्या समाधानकारक असेल अशी अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात शिवसेना आणि पतित पावन संघटनेची होणार युती

Monday Horoscope: पैशाची महत्वाची कामं पार पडतील, शिव उपासना लाभाची ठरेल; वाचा राशीभविष्य

Maharashtra Politics: ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा धोक्यात? मातोश्री'बाहेर ड्रोनच्या घिरट्या

धक्कादायक! 300 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज समुद्रात बुडाले, शेकडो बेपत्ता

Forest Department Fails To Control Leopard: बिबट्याची दहशत, प्रशासनाचं अपयश, स्वरक्षणासाठी गळ्यात खिळ्यांचे पट्टे

SCROLL FOR NEXT