Gold Silver Today Rate Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोनं १८००० रुपयांनी स्वस्त; तुमच्या शहरातील आजचे दर किती?

Gold-Silver Price Today: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात काहीच बदल झाला नाही. आज खरेदी करायला जाण्यापूर्वी दर किती ते जाणून घ्या...

Priya More

Summary -

  • सोन्याच्या दरात मोठी घसरण

  • १० तोळे सोनं १८,००० रुपयांनी स्वस्त

  • २४, २२ आणि १८ कॅरेट दरात मोठी घसरण

  • ग्राहकांसाठी खरेदीची सुवर्णसंधी

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गेल्या महिनाभरापासून सोनं-चांदीच्या दरामध्ये सतत चढ-उतार होत आहे. सोनं-चांदीच्या दरात वाढ होत असल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. पण आज सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात आज मोठी घसरण झाली आहे. सोन्याचे दर घसरल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १८००० रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आज सोनं खरेदी करायला जाण्यापूर्वी २४, २२ आणि कॅरेटचे दर किती ते जाणून घ्या....

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेटचे १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १,८०० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,४९,१३० रुपये खर्च करावे लागणार आहे. रविवारी हे सोनं १,५०,९३० रुपयांना विकले गेले. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १८००० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १४,९१,३०० रुपये खर्च करावे लागलीत. रविवारी हे सोनं १५,०९,३०० रुपयांना विकले गेले.

आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील चांगलीच घसरण झाली आहे. २२ कॅरेटचे १ तोळा सोनं १,६५० रुपयांनी स्वस्त झाले आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,३६,७०० रुपये मोजावे लागणार आहे. रविवारी हे सोनं १,३८,३५० रुपयांना विकले गेले. तर २२ कॅरेटचे १० तोळा सोनं १६,५०० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १३,६७,००० रुपये खर्च करावे लागतील. रविवारी हे सोनं १३,८३,५०० रुपयांना विकले गेले.

२४ आणि २२ कॅरेटपाठोपाठ १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १,३५० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,११,८५० रुपये खर्च करावे लागतील. रविवारी हे सोनं १,१३,२०० रुपयांना विकले गेले. १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १३,५०० रुपयांनी घसरण झाली. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला ११,१८,५०० रुपये मोजावे लागतील. रविवारी हे सोनं ११,३२,००० रुपयांना विकले गेले.

तुमच्या शहरातील २४ कॅरेटचे दर किती?

मुंबई -१४,९१३ रुपये

पुणे- १४,९१३ रुपये

चेन्नई - १५,०६६ रुपये

दिल्ली - १४,९२८ रुपये

कोलकाता - १४,९१३ रुपये

बंगळुरू - १४,९१३ रुपये

अहमदाबाद - १४,९१८ रुपये

तुमच्या शहरातील २२ कॅरेटचे दर किती?

मुंबई - १३,६७० रुपये

पुणे- १३,६७० रुपये

चेन्नई - १३,८१० रुपये

दिल्ली - १३,६८५ रुपये

कोलकाता - १३,६७० रुपये

बंगळुरू - १३,६७० रुपये

अहमदाबाद - १३,६७५ रुपये

तुमच्या शहरातील १८ कॅरेटचे दर किती?

मुंबई - ११,१८५ रुपये

पुणे- ११,१८५ रुपये

चेन्नई - ११,५२० रुपये

दिल्ली - ११,२०० रुपये

कोलकाता - ११,१८५ रुपये

बंगळुरू - ११,१८५ रुपये

अहमदाबाद - ११,१९० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Digital India Internship: कोणतीही परीक्षा नाही, थेट मंत्रालयात इंटर्नशिपची संधी; स्टायपेंडदेखील मिळणार; अर्ज कसा करावा?

Maharashtra News Live Update: मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटात टेम्पो ट्रँव्हलर बसचा अपघात

Israel Lebanon conflict: जगात पुन्हा युद्धाचा भडका उडाला; भीषण हल्ल्यात १४ जणांचा मृत्यू

अकोला देशात सर्वाधिक उष्ण, पारा थेट ४७ अंशावर, राज्यातील या जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'

Summer Heatwave Protection Tips: राज्यात उष्णतेचा पारा वाढला, स्वत:ची व कुटुंबाची काळजी कशी घ्याल? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT