Gold Price Drop Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, 10 तोळा 14200 रुपयांनी स्वस्त; 18K- 22K आणि 24K चे आजचे दर किती?

Gold Price Drop Today: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या दरात आज मोठी घसरण झाली तर चांदीच्या दरात काहीच बदल झाला नाही. त्यामुळे खरेदीची सुवर्णसंधी आहे.

Priya More
  • आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण

  • २४ कॅरेट सोन्याच्या दरात १० तोळ्यांमागे १४,२०० रुपयांची घसरण

  • २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरातही मोठी घट

  • आज सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठा बदल झाला आहे. सोन्याच्या दरात घसरण झाली असून आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १४२० रुपयांची घसरण झाली आहे. २४ कॅरेटसोबत आज २२ आणि १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. आज सोनं स्वस्त झालं पण चांदीच्या दरात काहीच बदल झाला नाही. जर आज तुम्ही सोनं खरेदी करण्यासाठी जाणार असाल तर आजचे २४,२२ आणि १८ कॅरेट सोन्याचे दर किती ते जाणून घ्या...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल १४२० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना १,४२,९१० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १४,२०० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १४,२९,१०० रुपये खर्च करावे लागणार आहे. जर सोन्यात तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर आज चांगली संधी आहे.

सोन्याचे दागिने हे २२ कॅरेटमध्ये बनवले जातात. त्यामुळे हे सोनं खरेदीवर ग्राहकांचा भर असतो. आज तुम्ही सोन्याचे दागिने देखील कमी दरात बनवू शकता. आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाली. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १३०० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,३१,००० रुपये खर्च करावे लागतील. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १३००० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १३,१०,००० रुपये मोजावे लागतील.

तर, २४ आणि २२ कॅरेट सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटचं सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. १८ कॅरेटचे १ तोळा सोनं १०७० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,०७,१८० रुपये मोजावे लागतील. तर १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १०७०० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १०,७१,७०० रुपये खर्च कारवे लागतील. आज सोन्याच्या दरात बदल झाला पण चांदीचे दर स्थिर आहेत. आज १ किलो चांदी २,३५,००० रुपयांना विकली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्योगांच्या स्थलांतराच्या इशाऱ्यानंतर एकनाथ शिंदेंची रॅपिड अ‍ॅक्शन! आधुनिक पद्धतीने चाकणचे खड्डे बुजवायला सुरूवात

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये एकनाथ शिंदेंची अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू

Doctor Attack: डॉक्टर रुग्णाला समजावत होते, मुलगा संतापला; केबिनमध्ये घुसून डॉक्टरला मारहाण

Famous Actress Death: प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्रीची प्राणज्योत मालवली; फुफ्फुसांच्या आजाराशी झुंज ठरली अपयशी

Alibaug Fort : समुद्राच्या लाटांमध्ये उभा असलेला ३०० वर्षांचा भव्य किल्ला! अलिबागला गेल्यावर 'हे' सिक्रेट ठिकाण नक्की पाहा

SCROLL FOR NEXT