7th pay commission Meta ai
बिझनेस

BEST Salary Hike: खुशखबर! बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ; सातव्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

7th Pay Commission : बेस्ट कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर वेतनश्रेणी, कंत्राची कामगारांना समान वेतन आणि नैमित्तिक कर्मचाऱ्यांसाठी वेतन निश्चितीची शिफारस करण्यास आली आहे.

Sakshi Sunil Jadhav

बेस्ट उपक्रमातील हजारो कर्मचाऱ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. बेस्ट समितीच्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भातल्या तीन महत्त्वाच्या शिफारशींच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये सातव्या वेतन आयोगाच्या समकक्ष सुधारित वेतनश्रेणी लागू करणे, कंत्राटी कामगारांना 'समान कामास समान वेतन' देणे आणि नैमित्तिक कामगारांचे काल्पनिक वेतन ठरवणे या निर्णयांचा समावेश आहे.

या निर्णयाचा थेट फायदा ३८ हजारांपेक्षा जास्त नियमित आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना होण्याची शक्यता आहे. मात्र हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी महापालिका आणि राज्य सरकारने गठित केलेल्या विशेष अभ्यास समितीकडे पाठवण्यात येणार आहे.

सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर वेतनश्रेणी

राज्य सरकार आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे बेस्ट कर्मचाऱ्यांनाही सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे. २०१६ ते २०२५ या नऊ वर्षांच्या कालावधीसाठी सुधारित वेतन करार करण्याचा प्रस्ताव असून, त्याचा लाभ २७ हजार कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. या निर्णयामुळे बेस्ट उपक्रमावर तब्बल ६ हजार कोटी रुपयांचा आर्थिक भार पडण्याचा अंदाज आहे.

कंत्राटी कामगारांना ‘समान काम, समान वेतन’

वेट लीजवरील कंत्राटी कामगारांसाठीही महत्त्वाची शिफारस करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र कंत्राटी कामगार नियम, १९,७१ मधील तरतुदींच्या आधारे कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे समन कामासाठी समान वेतन देण्याची शिफारस करण्यात आली आहे. यामुळे जवळपास ९ हजार कंत्राटी कामगारांच्या वेतनात वाढ होऊ शकते. यासाठी वार्षिक ४७५ कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे.

२,२०० नैमित्तिक कामगारांनाही दिलासा

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, ३१ मार्च २०१६ पासून सेवेत सामावून घेतलेल्या २,२०० नैमित्तिक कामगारांना काल्पनिक वेतन निश्चिती देण्याता निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्यक्ष रूजू झाल्याच्या तारखेपासून हे वेतन ठरवले जाणार असून, त्यासाठी कोणतीही थकबाकी देण्यात येणार नाही. या निर्णयासाठी सुमारे ३०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. आता महापालिका आणि राज्य सरकारकडून अंतिम मंजुरी कधी मिळते, याकडे हजारो कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वर्धा हादरलं! मदतीच्या बहाण्याने फसवलं; रेल्वे स्थानकावर तरुणीवर सामूहिक अत्याचार

SBI ATM Rules: ऐकलं का! पुढील महिन्यापासून ATM मधून पैसे काढण्यासाठी शुल्क लागणार; जाणून घ्या किती आकारला जाणार चार्ज

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 30 तारखेआधीच मिळणार पगार; सरकारचा मोठा निर्णय

Fact Check: नोटांचे बंडल आणणारा कावळा? 500 च्या नोटांचं बंडल खिडकीत आणून ठेवलं?

मोठी बातमी ! राज्यातील विद्यापीठांमध्ये ३५ वर्षांनी पुन्हा उडणार निवडणुकांचा धुरळा, सरकारचा मोठा अ‍ॅक्शन प्लॅन तयार

SCROLL FOR NEXT