Gold-Silver Price 15 September 2024 Saam TV
बिझनेस

Gold-Silver Rate : सोने-चांदी दरात विक्रमी वाढ, खरेदीदारांना सर्वात मोठा झटका; ३३ वर्षांत पहिल्यांदाच घडलं असं

Gold-Silver Price 15 September 2024 : गेल्या ४८ तासांत सोन्याचे दर २००० रुपये तर चांदीचे तर तब्बल ७००० रुपयांनी वाढले आहेत.

Satish Daud

तुम्ही जर सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. कारण, सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. गेल्या ४८ तासांत सोन्याचे दर २००० रुपये तर चांदीचे तर तब्बल ७००० रुपयांनी वाढले आहेत. विशेष बाब म्हणजे, या किंमती आणखीच वाढण्याची शक्यता आहे.

गेल्या महिनाभरापूर्वी सोन्या चांदीच्या भावात मोठी कपात झाली होती. मात्र अमेरिकेतील अर्थव्यवस्था व फेडरल रिझर्व्ह बँकेने कमी केलेले व्याजाचे दर यामुळे दोनच दिवसात चांदीच्या भावात प्रतिकीलो जवळपास ७ हजारांची वाढ झाली आहे. तर सोन्याच्या भावातही प्रति तोळा दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे.

तज्ञांच्या मते गेल्या १९९१ नंतर म्हणजे साडेतीन दशकांत अत्यंत कमी कालावधीत म्हणजे दोन दिवसात ही सर्वात मोठी वाढ आहे. संपूर्ण देशात खामगाव येथील चांदीची बाजारपेठ प्रसिद्ध आहे .आता खामगाव येथील बाजारपेठेत चांदी ९१००० रू प्रति किलो तर सोने ७५२०० रू प्रति तोळे मिळत आहे. मात्र ही दरवाढ दिवाळी पर्यंत स्थिरावेल असंही चांदीच्या व्यापाऱ्यांना वाटत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

SCROLL FOR NEXT