Gold Silver Rate (26th January 2024) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate (26th January 2024): सोन्याच्या भावात वाढ, चांदीही चकाकली; जाणून घ्या मुंबई-पुण्यातील आजचे दर

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (26th January 2024):

जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या भावात पतझड पाहायला मिळाली. लवकरच लग्नसराईचा काळ सुरु होईल. त्यामुळे खरेदीदारांचा कल धातूंच्या किमतीवर अधिक असणार आहे.

परंतु, मिळालेल्या माहितीनुसार अर्थमंत्रालयाने सोन्या-चांदीच्या आयाती शुल्कावर १५ टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहकांना सोने (Gold) -चांदी खरेदी करताना अधिकचे पैसे (Price) मोजावे लागतील.

यामध्ये देशातंर्गत सोन्याच्या दरात वाढ होताना दिसून येत आहे. अमेरिकन बाजारात सोन्याचे भाव अस्थिर झालेले पाहायला मिळाले आहे. यूएस मध्यवर्ती बँकर्सच्या लवकर दर कपातीमुळे डॉलर आणि ट्रेझरी उत्पन्न अधिक मजबूत झाल्यामुळे आज सोन्याचा भाव या ठिकाणी जास्त आहे. तिसऱ्या आठवड्यात शुक्रवारी सोन्याच्या भावात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. जाणून घेऊया मुंबई-पुण्यातील आजचा भाव.

आज गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,७९५ रुपये मोजावे लागणार आहे. २२ कॅरेटनुसार सोन्याच्या भावात १०० रुपयांनी (Price)वाढ झाली आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६३,२०० रुपये मोजावे लागतील. २४ कॅरेटसाठी १०० रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळाली.

आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७६,५०० रुपये मोजावे लागतील. आज चांदीच्या किमतीत प्रति किलोत ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. (Gold Silver Price Today In Marathi)

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (Gold Rate Today)

  • मुंबई- ६३,०५० रुपये

  • पुणे - ६३,०५० रुपये

  • नागपूर - ६३,०५० रुपये

  • नाशिक - ६३,०८० रुपये

  • ठाणे - ६३,०५० रुपये

  • अमरावती - ६३,०५० रुपये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budgam Bus Accident Video: काश्मीरमध्ये पुन्हा भीषण दुर्घटना; BSF जवानांनी खचाखच भरलेली खोल दरीत कोसळली, ४ जणांचा मृत्यू

Israel - Hezbollah War : हिजबोल्ला-इस्त्राइलमध्ये युद्ध पेटलं, स्पेशल रिपोर्ट

Maharashtra News Live Updates : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित

Pune Crime : शाळकरी मुलीवर अत्याचार, इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं; 'गुड टच, बॅड टच'मुळं धक्कादायक घटना उघड

Nitin Gadkari: माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट, नितीन गडकरी यांनी सांगितला 'तो' प्रसंग

SCROLL FOR NEXT