Gold Silver Rate Hike Saam TV
बिझनेस

Gold Silver Rate Hike : सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ; वाचा महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील आजचा भाव

Gold Silver Rate Hike (19 May 2024) : जागतिक बँकांचे व्याजदर वाढल्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्याकडे आपली गुंतवणूक वळवल्यामुळे सोन्यात सातत्याने भाव वाढ होत असल्याचं दिसत आहे.

Ruchika Jadhav

सलग दोन-दिवस सोने चांदीच्या किंमती घसरल्यानंतर आज सोन्यासह चांदीने देखील मोठी उसळी घेतली आहे. जळगावच्या बाजारात सोन्याचे एक हजाराने तर चांदीचे प्रती किलोसाठी 3 हजार रुपयांनी दर वाढले आहेत. राज्यात मुंबई आणि पुणे या शहरांमधील किंमती देखील वाढल्या आहेत.

जागतिक बँकांचे व्याजदर वाढल्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्याकडे आपली गुंतवणूक वळवल्यामुळे सोन्यात सातत्याने भाव वाढ होत असल्याचं दिसत आहे. जळगावच्या बाजारात सोन्याचे भाव 76 हजार 200 जीएसटीसह तर चांदीचे भाव प्रति किलो 91 हजार इतके झाले आहेत.

जळगावच्या बाजारात सोने व चांदीने उच्चांकी घेतली असून सोन्याचे भाव हे 1000 रुपयांनी तर चांदीचे भाव हे प्रति किलो तीन हजार रुपयांनी वाढले असून सोने-चांदी चे भाव हे सर्वसामान्य नागरिकांच्या अव्यकाच्या बाहेर पोहचले आहेत.

मुंबई पुण्यातील सोने-चांदीच्या किंमती

मुंबईत २२ कॅरेट सोनं ६,७५९ प्रति तोळा, तर २४ कॅरेट ७,३७४ आणि १८ कॅरेट सोनं ५,५३० रुपये प्रति ग्रामने विकलं जात आहे. तर चांदी मुंबईत आणि पुण्यात ९३,००० प्रति किलो आहे. पुढील काळात सोन्यात आणखी भाव वाढ होणार अशी शक्यता सोने व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirdi Ke Sai Baba : 'शिर्डी के साई बाबा' फेम अभिनेत्याची प्रकृती बिघडली; उपचारासाठी पैसा नाही, रणबीरच्या बहिणीकडून मदतीचा हात

IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया पहिल्या टी-२० पूर्वी दुःखद घटना, तरुण क्रिकेटरचा बॉल लागून मृत्यू

Weight Loss Soup: वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी बनवा भाज्याचं सूप, आठवडाभरात पोटाची चरबी होईल कमी

Thane Ring Metro : २९ किमी लांब अन् २२ स्थानके; ठाणे रिंग मेट्रोच्या कामाचा मूहूर्त ठरला, वाचा संपूर्ण माहिती

'घरी ये नाहीतर, तुझे फोटो..'; वस्तीतील तरूणाकडून अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती, अलिबागमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT