Gold-Silver Rate Saam TV
बिझनेस

Gold-Silver Rate : सोने-चांदीच्या दरांत वाढ; वाचा मुंबईसह पुण्यातील आजचा भाव काय?

Ruchika Jadhav

गेल्या आठवड्यात सातत्याने सोने आणि चांदीचा भाव कमी झाल्याचं पाहायला मिळालं. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी देखील सोन्याच्या किंमती कमी झाल्या. त्यानंतर आज मंगळवारी मात्र सोने आणि चांदींचा भाव काही प्रमाणात वाढला आहे. किंमती वाढल्याने आता त्या नेमक्या कितीने वाढल्यात त्याची माहिती पुढे जाणून घेणार आहोत.

२४ कॅरेट सोन्याचा भाव

आज १०० ग्राम सोन्याचा भाव १०० रुपयांनी वाढलाय. त्यामुळे आज सोनं ६,९३,२०० रुपयांवर आहे. तर एक तोळा २४ कॅरेट सोन्याचा भाव ६९,३२० रुपये आहे. ८ ग्राम सोन्याचा भाव ५५,४५६ रुपये आणि १ ग्राम सोन्याचा भाव ६,९३२ रुपये आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव

आज २२ कॅरेट १०० ग्राम सोन्याचा भाव १०० रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे १०० ग्रामचा भाव ६,३५,६०० रुपयांवर आहे. १० ग्राम म्हणजे १ तोळा सोन्याचा भाव आज किरकोळ १० रुपयांनी वाढला असून ६३,५६० रुपये इतकी त्याची किंमत आहे. ८ ग्राम सोनं ५०,८४८ रुपयांना विकलं जातंय. तर १ ग्राम सोन्याचा भाव ६,३५६ रुपये असा भाव आहे.

विविध शहरांतील १ ग्राम सोन्याचा भाव

मुंबईमधील सोन्याचा भाव

२२ कॅरेट - ६,३४१ रुपये

२४ कॅरेट - ६,९१७ रुपये

पुण्यातील सोन्याचा भाव

२२ कॅरेट - ६,३४१ रुपये

२४ कॅरेट - ६,९१७ रुपये

पटनामधील सोन्याचा भाव

२२ कॅरेट - ६,३४६ रुपये

२४ कॅरेट - ६,९२२ रुपये

जयपूरमधील सोन्याचा भाव

२२ कॅरेट - ६,३५६ रुपये

२४ कॅरेट - ६,९३२ रुपये

लुधियानामधील सोन्याचा भाव

२२ कॅरेट - ६,३५६ रुपये

२४ कॅरेट - ६,९३२ रुपये

कोलकत्तामध्ये सोन्याचा भाव

२२ कॅरेट - ६,३४१ रुपये

२४ कॅरेट - ६,९१७ रुपये

चांदीचा भाव

गेल्या आठवड्यात सोन्यासह चांदी सुद्धा चांगलीच कोसळत चालली होती. मात्र आज चांदीचा भाव सुद्धा वाढला आहे. आज चांदी प्रति किलो ८५,१०० रुपये आहे. तर मुंबई, पुणे, जालना, नाशिक, धुळे, औरंगाबाद अशा विविध शहरांत ८५,१०० रुपये प्रति किलो दराने चांदी विकली जातेय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT