Customers check gold ornaments at a bullion shop in Jalgaon as prices soar following tensions between Israel and Iran. saam tv
बिझनेस

Todays Gold Rate: इस्रायल-इराण युद्धाचा भडका; सोने आणि आणि चांदीच्या दरात विक्रमी वाढ, जाणून घ्या आत्ताचे दर

Gold, Silver Prices Hike: अमेरिका इराण इजराइल युद्धाचा जळगावच्या सराफ बाजारावर देखील मोठा परिणाम झालाय. सोने आणि आणि चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे.

Bharat Jadhav

  • सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 72 हजार 10 रुपयांवर

  • अमेरिका व इराण इजराइल युद्धाचा परिणाम

  • सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ

अमेरिका इराण इजराइल युद्धाचा जळगावच्या सराफ बाजारावर देखील मोठा परिणाम झाला आहे. सोने आणि आणि चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 72 हजार 10 रुपयांवर तर चांदीचे दर 2 लाख 98 हजार 700 रुपयांवर पोहोचले आहेत. अमेरिका व इराण इजराइल युद्धाचा परिणाम झाल्याने कमी कालावधीत सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. अमेरिका, इराण, इस्त्रायल युद्धाचा परिणाम अनेक गोष्टींवर होणार आहे. या युद्धाचा सोन्याच्या दरांवर अधिक झाला आहे. अगदी कमी कालावधीत सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

अवघ्या दोन तासात सोन्याच्या दरात तब्बल 1 हजार 500 रुपयांची पुन्हा मोठी वाढ झाली. एकाच दिवसात सोन्याच्या दरात 8 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 20 हजारांची वाढ झाली आहे. आज 10 ग्रॅम सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 72 हजार 10 रुपयांवर पोहोचले आहेत. आतापर्यंत सोन्याच्या भावातील ही सर्वात मोठी वाढ आहे. तर चांदीचे दर 2 लाख 98 हजार 700 रुपयांवर पोहोचलेत.

आज सकाळी 10 तोळा सोन्याच्या दरामध्ये 31,600 रुपयांनी वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरामध्ये देखील वाढ झाली आहे. 1 ग्रॅम चांदी 10 रुपयांनी महाग झाली आहे. 24 कॅरेटच्या 1 तोळा सोन्याचे दर 3,160 रुपयांनी वाढले आहे. 24 कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदीसाठी 1,64, 730 रुपये खर्च करावे लागणार आहेत. शुक्रवारी या सोन्याचा दर 1,61, 570 रुपये होता. तर 24 कॅरेटचे 10 तोळा सोनं 31,600 रुपयांनी महाग झाले आहे. 22 कॅरेटच्या 1 तोळा सोन्याच्या दरामध्ये 2,900 रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी 1,51,000 रुपये खर्च करावे लागणार आहे.

जागतिक भू-राजकीय तणाव, अमेरिकन डॉलरमधील घसरण आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढलेला ओढा यामुळे शनिवारी भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. अमेरिकन डॉलर कमकुवत झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी वाढली आहे. डॉलर कमजोर झाल्यास इतर चलन धारकांसाठी सोने तुलनेने स्वस्त ठरते, त्यामुळे जागतिक स्तरावर खरेदी वाढते. याचा थेट परिणाम भारतीय बाजारावर दिसून येतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : जंतर-मंतरवर खळबळ! CJPचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका पोलिसांच्या ताब्यात

पीएम किसान योजनेतून ४,००० नावे वगळली जाणार; शासनाकडून कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन, काय आहे कारण?

Kuttu Flour Puri Recipe : उपवासाची कुट्टूची पुरी बनवताना तुटते? पिठात मिसळा 'हा' पदार्थ, पुरी होईल कुरकुरीत अन् टम्म फुललेली

Chilled Water: थंड पाणी पिणे फायदेशीर की हानिकारक? जाणून घ्या शरीरावर होणारे ७ परिणाम!

Gold Rate Today: नवरात्रीत सोन्याच्या दरात मोठी घसरण, 10 तोळा सोनं 3,900 रुपयांनी स्वस्त; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

SCROLL FOR NEXT