सुप्रीम मसकर
Gold and Silver Prices Set to Fall Soon? Experts Predict a Major Correction : लखलखत्या सोन्याचा माज आता उतरणार आहे.. सोन्या चांदीच्या दरवाढीचा फुगा लवकरच फुटणार आहे.. असं आम्ही का म्हणतोय? सोन्या- चांदीच्या किंमतीत घसरण कधी होणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
सोन्या-चांदीचे भाव सध्या गगनाला भिडलेत... मात्र भविष्यात याचं सोन्या- चांदीच्या किंमतीत मोठी घसरण (Gold and Silver Prices Likely to Drop Soon) पाहायला मिळणार आहे... सोन्या- चांदीच्या किंमतीबाबत तज्ज्ञाचं नेमकं काय म्हणणं आहे.. पाहूयात..
2008-2011 ला रुपयाच्या तुलनेत डॉलर्स कमकुवत झाल्यानंतर सोन्या-चांदीच्या किंमती 10-15 टक्के घसरण झाली होती... त्यामुळेच भविष्यात सोन्याच्या किंमतीत 30-35 टक्के तर चांदीच्या किंमतीत 50 टक्क्यांने घट होण्याची शक्यता आहे.. ज्यामुळे सोन्याच्या किमती प्रति 10 ग्रॅम 77 हजार 701 पर्यंत तर चांदीच्या किमती प्रति किलो 77 हजार 450 होऊ शकते... जगावर आर्थिक मंदीचं सावट असल्यानं या किंमतीत घसरण होऊ शकतं..
दुसरीकडे भविष्यात सोन्या- चांदीच्या किंमतीत आणखी वाढ दिसून येईल, असाही मतप्रवाह पाहायला मिळतोय.. 2023 पासून सोन्या- चांदीच्या किंमतीत सातत्यानं वाढ होतेय.. अशातच भविष्यात सोन्या चांदीच्या किंमतीत घट झाल्यास गुंतवणुकदारांना याचा फटका बसू शकतो... त्यामुळे सोन्या-चांदीत नेमकी गुंतवणुक कधी आणि किती करायची याचा निर्णय मार्केटचा नीट अभ्यास करून घेणं गरजेचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.