(2nd April 2024) Gold Silver Price In Maharashtra Saam Tv
बिझनेस

Today's Gold Silver Rate : खरेदीदारांना झटका! सोनं ७० हजारांच्या उंबरठ्यावर, चांदीच्या किमतीही गगनाला; जाणून घ्या आजचे दर

(2nd April 2024) Gold Silver Price In Maharashtra: काल पहिल्याच दिवशी सोने १००० रुपयांनी तर चांदीत प्रतिकिलोत ६०० रुपयांनी वधारली. एप्रिल महिना सुरु होताच सोन्या-चांदीचे भाव गगनाला पोहचले आहे.

कोमल दामुद्रे

24k Gold Silver Rate In Maharashtra:

एप्रिल महिना सुरु होताच सोन्या-चांदीचे भाव गगनाला पोहचले आहे. काल सोन्याच्या भावात वाढ झालेली पाहायला मिळाली. लग्नसराईत सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

काल पहिल्याच दिवशी सोने १००० रुपयांनी तर चांदीत प्रतिकिलोत ६०० रुपयांनी वधारली. मार्च महिन्यात जीएसटीसह सोन्याचे भाव ७० हजारांवर पोहोचले तर चांदी ७८ हजारांवर पोहोचली. सोने लवकरच ७५ हजारांचा आकडा ओलांडणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अमेरिकन बँकांची स्थिती खराब असल्यामुळे मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून सोन्या-चांदीच्या भावात वाढ झाली. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सोन्याचा भाव हा ६७ हजारांवर पोहोचला. जाणून घेऊया मुंबई-पुण्यातील आजचे नवे दर

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ६,३५० रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६९,२६० रुपये (Price) मोजावे लागणार आहे. आज सोन्याच्या (Gold) भावात २७० रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. तसेच आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७९,००० रुपये मोजावे लागतील. तर चांदीच्या भावात ४०० रुपयांनी वाढ झाली आहे.

2. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (24k Gold Rate Today)

  • मुंबई- ६९,११० रुपये

  • पुणे - ६९,११० रुपये

  • नागपूर - ६९,११० रुपये

  • नाशिक - ६९,१४० रुपये

  • ठाणे - ६९,११० रुपये

  • अमरावती - ६९,११० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leopard Terror: 15 दिवसांत बिबट्याने घेतला तिघांचा बळी,'नरभक्षक बिबट्याला गोळ्या घाला', गावकरी आक्रमक

Vote Chori: व्होटचोरीला हिंदू-मुस्लीमचा रंग; बोगस मतदारांचा फायदा नेमका कुणाला?

Maharashtra Politics: हर्षवर्धन पाटील पुन्हा भाजपच्या वाटेवर? भरसभेत मुख्यमंत्री,पंतप्रधानांचे गायले गोडवे

BMC Election : आगामी निवडणुकीत RPI महायुतीतून लढणार, पण...; रामदास आठवलेंनी सगळंच सांगितलं

₹23 Crore Bull Not Dead: 23 कोटींच्या 'अनमोल'चा मृत्यू? हट्टाकट्टा रेड्याला अचानक काय झालं?

SCROLL FOR NEXT