Today's Gold Silver Rate, (22nd March 2024) Today's Gold Silver Price In Maharashtra in Marathi Saam tv
बिझनेस

Today's Gold Silver Rate : सोन्याच्या दरात उसळी, चांदीचा भाव गडगडला; जाणून घ्या मुंबई-पुण्यातील आजचा दर

(22nd March 2024) Today's Gold Silver Price In Maharashtra in Marathi: लग्नसराईचा काळ सुरु झाला असून या काळात अधिक प्रमाणात दागिने खरेदी केले जातात. धातुच्या किमती वाढल्याने खरेदीदारांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (22nd March 2024):

पुन्हा एकदा सोन्याच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला आहे. देशांतर्गत जोरदार खरेदीमुळे नागपूर सराफ बाजारात दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचा भाव तीन टक्क्यांनी जीएसटीसह ६९,३०० रुपयांवर पोहोचला आहे.

लग्नसराईचा काळ सुरु झाला असून या काळात अधिक प्रमाणात दागिने खरेदी केले जातात. धातुच्या किमती वाढल्याने खरेदीदारांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे. सोन्याच्या भावात मार्च महिन्यापासून उसळी पाहायला मिळाली. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात भावात चढ-उतार पाहायला मिळाले.

सराफ बाजारातील व्यापाऱ्यांच्या मतानुसार सोन्याच्या सतत वाढत्या दरामुळे लवकरच ७० हजारांचा टप्पा गाठणार आहे. सोन्याच्या दरात अचानक तेजी आल्यामुळे मार्च महिन्यात सोन्यात कमालीची वाढ झाली आहे. तीन टक्के जीएसटीसह ४,१२० रुपयांनी वाढले. त्यामुळे गुंतवणुकदारांची चांदी झाली आहे. सध्या सोन्याचा भाव हा ६७ हजार रुपयांवर पोहोचला असून चढ-उतार पाहायला मिळत आहे. जाणून घेऊया मुंबई-पुण्यातील आजचा दर

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ६,१५० रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६७,०८० रुपये (Price) मोजावे लागणार आहे. आज सोन्याच्या (Gold) भावात ४५० रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. तसेच चांदीच्या किमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७६,५०० रुपये मोजावे लागतील. तर चांदीच्या भावात २००० रुपयांनी घसरण झाली आहे.

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (24k Gold Rate Today)

  • मुंबई- ६६,९३० रुपये

  • पुणे - ६६,९३० रुपये

  • नागपूर - ६६,९३० रुपये

  • नाशिक - ६६,९६० रुपये

  • ठाणे - ६६,९३० रुपये

  • अमरावती - ६६,९३० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raksha Bandhan 2025 : सलमान खान ते करीना कपूर; बॉलिवूडमधील ८ सुपरकूल भावंडे

Password Security: 'हा' पासवर्ड वापरत असाल तर थांबा! हॅकर्स करू शकतात फक्त एका सेकंदात क्रॅक

देवाभाऊ महिन्याला ₹१५०० नको, लाडकीचं मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र, साताऱ्याचे नेमकं प्रकरण काय?

Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवे वळण; मुख्य आरोपी वाल्मीक कराडच्या मोबाईलचा सीडीआर सार्वजनिक करण्याची मागणी

Rules for removing rakhi: बहिणीने भावाला बांधलेली राखी मनगटावर किती दिवस ठेवावी? जाणून घ्या राखी काढण्याचे नियम

SCROLL FOR NEXT