Today's Gold Silver Rate, (15th March 2024) Today's Gold Silver Price In Maharashtra in Marathi Saam tv
बिझनेस

Today's Gold Silver Rate : सोन्याच्या दरात भरमसाठ वाढ, चांदीही चकाकली; जाणून घ्या मुंबई-पुण्यातील आजचा भाव

(15th March 2024) Today's Gold Silver Price In Maharashtra in Marathi: मार्च महिन्यात सोन्याच्या दरात वाढ होताना दिसून आली. मागच्या १३ दिवसांत सोने तीन हजारांहून अधिक रुपयांनी महागले आहे.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (15th March 2024):

मार्च महिन्यात सोन्याच्या दरात वाढ होताना दिसून आली. मागच्या १३ दिवसांत सोने तीन हजारांहून अधिक रुपयांनी महागले आहे. ऐन लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दरात वाढ झाल्याने धातुंच्या किमतीसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहे.

मागच्या वर्षभरात सोन्याच्या दरात १३ हजारांनी वाढ झाली आहे. पण येत्या काही दिवसांत सोने प्रति तोळा ७० हजार रुपयांपर्यंत वाढेल असे सराफ बाजारातील व्यापारांनी मत नोंदवले आहे.

मागच्या वर्षी मे, नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या १ तारखेला सोन्याच्या भावाने उच्चांकाची पातळी ओलांडली होती. त्यानंतर मार्च २०२४ मध्ये सोन्याचा भाव हा ६६ हजारांवर पोहोचला आहे. जानेवारी महिन्यात सोन्याच्या (Gold) भावात वाढ झाली तर फेब्रुवारीमध्ये किंचित घट तर मागच्या पंधरा दिवसांपासून सोन्याच्या दरात प्रति तोळा चार हजार रुपयांनी वाढ झाली.

1. भावात वाढ का होतेय?

लग्नसराईच्या काळात सोन्याची मागणी अधिक असते. तसेच यंदा लग्नसराईचे मुहूर्तही अधिक असतात. त्यामुळे खरेदी वाढल्याचे कारण सांगितले आहे. तसेच सोन्याच्या गुंतवणुकीत (Investment) अधिक नफा मिळवून देणारी असल्याचे बोलले जाते. जाणून घेऊया मुंबई-पुण्यातील आजचा भाव

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ६,०७५ रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६६,२६० रुपये (Price) मोजावे लागणार आहे. तसेच चांदीच्या किमतीही स्थिर आहे. आज प्रतिकिलो चांदीसाठी ७७,००० रुपये मोजावे लागतील.

2. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (24K Gold Rate Today)

  • मुंबई- ६६,११० रुपये

  • पुणे - ६६,११० रुपये

  • नागपूर - ६६,११० रुपये

  • नाशिक - ६६,१४० रुपये

  • ठाणे - ६६,११० रुपये

  • अमरावती - ६६,११० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT