सणासुदीच्या काळात सोनं महागल्याने ग्राहकांची झोपच जणू उडाली. खरेदीदारांच्या काळात सोन्याचे भाव गगनाला पोहोचले आहेत. पितृपक्षाच्या काळात सोन्याचे दर घसरले होते परंतु, दसऱ्यापूर्वीच सोन्याच्या भावात वाढ झाली आहे.
मागील दोन महिन्यात सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली होती. परंतु, युद्धाचा परिणाम काही प्रमाणात सोने-चांदीच्या दरावर दिसून आला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातील सोन्याचे भाव घसरले परंतु, इस्त्राइल-हमास युद्धामुळे सोन्याच्या भावात वाढ झालेली पाहायला मिळाली. सध्या सोन्याच्या भावाने ६० हजारांचा आकडा पार केला आहे. अशातच दसरा-दिवाळीच्या काळात सोन्याचे दर आणखी महागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पितृपक्षाच्या काळात सोने ५७ हजार रुपयांवर येऊन पोहोचले होते तर मागच्या आठवड्याभरात सोन्याच्या किमतीत युद्धामुळे वाढ झाली. सोन्याच्या (Gold) किमतीत सतत पडझड होताना दिसून येत आहे. अशातच आज कालच्या दरापेक्षा सोन्याच्या भावात २७० रुपयांनी (Price) वाढ झाली आहे.
गुड रिटर्न्सच्या वेबासाइटनुसार आज २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ६,०९१ रुपये मोजावे लागणार आहे तर २४ कॅरेटनुसार ६०,९१० रुपये प्रतितोळ्यासाठी मोजावे लागणार आहे. चांदीच्या दरात कालच्या पेक्षा आज ५० रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळाली. प्रति किलोनुसार आज चांदीसाठी (Silver) ७४१० रुपये मोजावे लागणार आहे.
1. महत्त्वाच्या शहरातील आजचे दर किती?
गुड रिटर्न्सच्या वेबसाइट्नुसार आज मुंबई-पुणे आणि नागपूरमध्ये भाव काही प्रमाणात सारखाच आहे. २४ कॅरेटनुसार ६०,७६० रुपये मोजावे लागणार आहे. तर ठाण्यामध्ये ६०,७६० रुपये मोजावे लागतील. नाशिकमध्ये भावात वाढ झाली असून ६०,७९० रुपये मोजावे लागणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.