Gold Silver Price Today (18th October) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Price Today (18th October): खरेदीदारांना मोठा झटका! सोनं आठवडाभरात ५००० रुपयांनी महागलं, चांदीच्या दरातही उसळी, वाचा आजचे दर

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (18th October) :

काही दिवसांपूर्वी सोन्याचा भाव गडगडला होता. मागील दोन महिन्यात सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. पितृपक्षाच्या पंधरवड्यात नागपूरच्या सुवर्णनगरीत सोन स्वस्त झाल्यामुळे खरेदीदारांची मंदीयाळी पाहायला मिळाली.

इस्त्राइल हमास युद्धाचा काही प्रमाणात परिणाम पेट्रोल-डिझेल आणि सोन्या चांदीच्या दरावर दिसून आला. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचे दर कोसळले होते परंतु, मागील आठवड्यापासून सोन्याच्या दरात उसळी पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर मागील आठवड्याभरात ५००० रुपयांनी वाढले आहेत. सध्या सोन्याचा भाव ६० हजार असून दसरा-दिवाळीत आणखी महागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात सोन्याचा भाव किती यावर नजर टाकूया. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नवरात्री (Navratri) उत्सव सुरु झाला असून, सणासुदीत अनेक ग्रहाकांचा कल हा सोनं खरेदी करण्यावर असतो. दोन दिवसांपूर्वी सोन्याचे भाव किंचित घसरले होते. आज गुड रिटर्न्सच्या वेबासाइटनुसार २२ कॅरेटनुसार १ ग्रॅमसाठी ५,५६० रुपये तर २४ कॅरेटनुसार ६०,६४० प्रतितोळ्यासाठी मोजावे लागणार आहे. अशातच आज सोन्याचा भावात ५४०० रुपयांनी वाढ झाली आहे.

चांदीच्या (Silver) दरातही उसळी पाहायला मिळाली. प्रति किलोनुसार आज चांदीसाठी ७४६०० रुपये मोजावे लागणार आहे. मागील भावानुसार चांदीच्या दरात हजार रुपयांनी वाढ झाली आहे.

1. तुमच्या शहरातील सोन्याचे आजचे दर

गुड रिटर्न्सच्या वेबसाइट्नुसार आज मुंबई (Mumbai)पुण्यात २४ कॅरेटसाठी ६०,४९० रुपये मोजावे लागणार आहे. तर नाशिकमध्ये ६०,५२० रुपये प्रति तोळ्यासाठी मोजावे लागतील. नागपूरमध्ये देखील प्रति तोळ्याला ६०,४९० रुपये मोजावे लागतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Ramayana Movie : 31 वर्षांनंतर पुन्हा येणार 'रामायण' थिएटरमध्ये, 'या' चार भाषांमध्ये होणार प्रदर्शित

Rashmika Mandanna: श्रीवल्लीचा स्टनिंग लूक; ब्लॅक आऊटफिटमध्ये केला कहर

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

Maharashtra Politics : काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?

SCROLL FOR NEXT