Gold Silver Rate Today (16th November 2023) 16th November 2023 Gold Silver Price - Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate Today (16th November): लग्नसराईत सोन्याचा भाव वाढणार? जाणून घ्या मुंबईसह इतर शहरातील दर

Today's (16th November 2023) Gold Silver Rate In Maharashtra : आज चांदीच्या भावात ३०० रुपयांनी वाढ झाली आहे.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (16th November 2023):

गुंतवणूकीचा सर्वात चांगला ऑप्शन म्हणून सोन्याकडे पाहिले जाते. परंतु, काही जण याकडे डेड इन्व्हेस्टमेंट म्हणून पाहातात. तरी भारतीयांमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा कल दिसून येते.

दसरा दिवाळीच्या काळात सोन्याच्या भावाने ६२ हजारांचा आकडा पार केला होता. दिवाळीत सोन्याच्या भावात पतझड झालेली पाहायला मिळाली. दिवाळीनंतरचा काळ हा लग्नसराईचा काळ असतो. यावेळी सोने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा अधिक कल असतो.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मध्य पूर्वेमध्ये निर्माण झालेल्या भूराजकिय परिस्थितीमुळे सोन्याच्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परंतु, आता पुन्हा एकदा सोन्याला झळाळी पाहायला मिळाली. गेल्या साडेतीन वर्षात सोन्याचा दर हा २०७५ डॉलर प्रति तोळ्याच्या आसपास होता. तीन वेळा सोन्याच्या दराने उच्चांकाची पातळीही गाठली.

युद्धामुळे सोन्याच्या पुरवठ्यावर काही प्रमाणात निर्बंध आल्यास दरामध्ये वाढ होऊ शकते असे तज्ज्ञांनी मत मांडले आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत सोन्याचा दर ६८ ते ७० हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो.

दिवाळीत (Diwali) ग्राहकांना सोनं खरेदीला अधिक प्राधान्य दिले. वाढत जाणारा सोन्याचा भाव लग्नसराईत देखील आणखी वाढू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,६१० रुपये तर २४ कॅरेटनुसार १ तोळ्यासाठी ६१,१९० रुपये मोजावे लागणार आहे. तर चांदीच्या (Silver) किमतीतही वाढ झाली आहे. आज १ किलो चांदीसाठी ७५,००० रुपये मोजावे लागणार आहेत. चांदीच्या भावात ३०० रुपयांनी (Price) वाढ झाली आहे.

1. मुंबई-पुण्यात आज २४ कॅरेट सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील?

  • मुंबई- ६१, ०४० रुपये

  • पुणे - ६१, ०४० रुपये

  • नागपूर - ६१, ०४० रुपये

  • नाशिक- ६१,०७० रुपये

  • ठाणे - ६१, ०४० रुपये

  • अमरावती - ६१, ०४० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

हिंगोलीत अनंत चतुर्दशीचा जल्लोष; चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी लाखो महिला भाविकांची उपस्थिती|VIDEO

SCROLL FOR NEXT