Gold Silver Price Today (20th October) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Price Today (20th October): दसऱ्यापूर्वी सोनं ६१ हजारांवर, चांदीची चकाकी उतरली; तुमच्या शहरातील आजचा भाव किती?

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (20th October) :

दसरा-दिवळीसारख्या सणांमध्ये अनेक ग्राहकांचा कल हा सोनं खरेदी करण्याकडे असतो. खरेदीच्या काळात सोन्याच्या भावाने उच्चांकाची पातळी गाठली आहे. पितृपक्षाच्या काळात सोन्याचे दर घसरले होते. परंतु, दसऱ्यापूर्वी सोन्याचे भाव वाढल्याने सराफ बाजारात शुकशुकाट पाहायला मिळणार का असा प्रश्न ज्वेलर्संना पडला आहे.

मागील दोन महिन्यांच्या तुलनेत सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. आखाती देशातील युद्धाचा परिणाम सोन्या-चांदीवर दिसून आला आहे. आज सोन्याच्या भावाने ६१ हजारांचा आकाडा मोडला आहे. दसऱ्यापूर्वीच सोन्याच्या भावात वाढ झाल्याने दिवाळीत आणखी दर वाढू शकतात असे म्हटले जात आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पितृपक्षाच्या काळात सोन्याचा भाव ५७ हजारांवर होता. मागील पंधरा दिवसात सोन्याच्या भावात झपाट्याने वाढ झाली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात पतझड पाहायला मिळाली. आज २४ कॅरेटनुसार सोन्याचा भाव ७८० रुपयांनी (Price) वाढला आहे.

गुड रिटर्न्सच्या वेबासाइटनुसार आज २२ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ५६,५५० रुपये मोजावे लागणार आहे तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६१, ६९० रुपये प्रतितोळ्यासाठी मोजावे लागणार आहे. तर चांदीचा (Silver) दर प्रति किलोनुसार आज ७४,१०० रुपये आहे. चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

तज्ज्ञांच्या मते, दिवाळी पूर्वी सोनं अधिक महागण्याची शक्यता आहे. मुंबई-पुणे-नागपूर या प्रमुख शहरात आज सोन्याच्या (Gold) भाव २४ कॅरेटसाठी ६१,५३० रुपये तर नाशिकमध्ये ६१,५६० रुपये आहे. नाशिकमध्ये भावात किंचित वाढ झाली आहे. तर ठाण्यातही भाव मुंबई-पुण्यासारखाच आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT