Gold Silver Price Today (25th October) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Price Today (25th October): सोन्याची विक्रमी दराकडे वाटचाल! सोनं दहा दिवसांत ३००० रुपयांनी महागलं, चेक करा आजचे दर

Today's (25th October 2023) Gold Silver Rate In Maharashtra : आज मुंबई-पुण्यात सोन्याचा भाव किती?

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (25th October):

सणासुदीच्या काळात सोन्याच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांना टेन्शन आले आहे. खरेदीच्या काळात सोन्याच्या भावाने उच्चांकाची पातळी गाठली आहे. पितृपक्षाच्या काळात सोन्याचे दर घसरले होते.

परंतु, काल सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झालेली पाहायला मिळाली. मागील दोन महिन्याच्या तुलनेत सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली होती. आखाती देशातील युद्धाचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरावर मोठया प्रमाणात दिसून आला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मागच्या १० दिवसांत सोन्याच्या १० ग्रॅम भावात तब्बल ३००० रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळाली. दिवाळीपर्यंत सोन्याच्या भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. पितृपक्षाच्या काळात सोन्याच्या भाव ५७ हजारांवर होता. त्यानंतर इस्त्राइल हमास युद्धामुळे सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. ७ ऑक्टोबरला जळगावात सोन्याचा भाव ५७ हजार ३०० रुपये होता. त्यावेळी सोने २००० रुपयांनी घसरले होते.

विजयादशमीच्या पूर्वसंध्येला सोन्याच्या भावात घसरण झालेली पाहायला मिळाली. परंतु, काल पुन्हा सोन्याच्या भावात विक्रमी वाढ झाली आहे. आज सोन्याचा भाव ६१,९५० रुपये इतका आहे.

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,६८० रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६१,९५० रुपये मोजावे लागणार आहे. अशातच आज सोन्याच्या भावात ११० रुपयांनी (Price) वाढ झाली आहे. चांदीचा भावात आज कोणताही बदल झालेला नाही. आज १० ग्रॅम चांदीसाठी (Silver) ७४६ रुपये मोजावे लागणार आहे.

1. आज मुंबई-पुण्यात सोन्याचा भाव किती?

मुंबई-पुणे आणि नागपूरमध्ये आज २४ कॅरेट सोन्यासाठी ६१,८०० रुपये मोजावे लागणार आहे. तर नाशिकमध्ये आज सोन्याचा भाव ६१,८३० रुपये मोजावे लागणार आहे. ठाण्यातही भाव मुंबई (Mumbai)-पुण्यासारखाच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Medha Rana: बॉर्डर २ मध्ये झळकणारी मेधा राणा कोण? जाणून घ्या

Pune Rave party Case : प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल, एकनाथ खडसे यांच्याकडून गंभीर आरोप; पुणे पोलीस आयुक्तांकडून स्पष्टीकरण

Raigad : रायगडमध्ये मासेमारी बंदीच्या आदेशाचे उल्लंघन! 38 मच्छिमारांवर कारवाई | VIDEO

दह्यासोबत हे पदार्थ चुकूनही खाऊ नका, फूड पॉयझनचा असतो धोका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाषण सुरू, मंचावर भाजप नेत्याच्या डुलक्या; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT