Gold-Silver Price Hike Saam Tv
बिझनेस

Gold-Silver Price Hike: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; आता सोनं-चांदी खरेदी करणं आणखी महागणार

Government Increase Import Duty on Gold: केंद्र सरकारने सोन्याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सोन्यावरील आयात शुल्क वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे भविष्यात सोने महाग होऊ शकते.

Siddhi Hande

सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

सोन्यावरील आयात शुल्क वाढवले

सोने-चांदीच्या दरात वाढ होणार

सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. आता सोने-चांदीचे दर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोने चांदीचे दर वाढल्याने थेट सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार आहे. सरकारने सोने चांदीच्या दराबाबत मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने सोने-चांदीवर आयात शुल्क वाढवण्याची घोषणा केली आहे. सोने, चांदी आणि इतर अनेक धातूंवरील आयात शुल्क वाढवल्याची घोषणा केली आहे. अर्थ मंत्रालयाने काल याबाबत माहिती दिली. आजपासून हे नवीन शुल्क लागू होणार आहे.

केंद्र सरकारने आयात शुल्क वाढवल्याने सोने-चांदीचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, परदेशात सोन्याच्या दरात चांगलीच वाढ होईल. याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर परिणाम होत आहे.

सरकारने आयात शुल्क वाढवले (Gold Import Duty Hike)

सरकारने सोन्यावर लागणारे आयात शुल्क वाढवले आहे. आयात शुल्क ६ टक्क्यांवरुन १५ टक्के केले आहे. बेसिक कस्टम ड्यूटी ५ टक्क्यांनी वाढवून १० टक्के केली आहेत. यानंतर अॅग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट सेसमध्ये १ टक्क्यांनी वाढ केली आहे. हे शुल्क आता ५ टक्के झाले आहे. याचसोबत UAE कोट्यातून येणाऱ्या सोन्यावरदेखील सर्वात जास्त आयात शुल्क द्यावे लागणार आहे. याआधी हे दर खूप कमी होते.

सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार

सरकारच्या या निर्णयामुळे सोने खरेदी करणाऱ्यांवर परिणाम होणार आहे. आयात शुल्क वाढवल्याने सराफा व्यापाऱ्यांसाठी आयातीचा खर्च वाढणार आहे. त्याचा भार ग्राहकांवर होणार आहे. त्यामुळे सोने खरेदी करणे पूर्वीपेक्षा महाग होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अकोल्याला उष्ण लाटेचा इशारा, तापमान ४५ पार

मोठी बातमी! Ola, Uber आणि Rapido ला मोठा दणका! अनधिकृत बाईक टॅक्सींवर बंदी; सरकारची कठोर भूमिका

Fruit in Summer: उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी फळं कोणती? वाढत्या उकाड्यात नक्की करा आहारात समावेश

Tea Recipe: चहामध्ये साखरेऐवजी 'हा' एक पदार्थ टाका; चवीसोबतच आरोग्यालाही मिळतील 5 जबरदस्त फायदे

Dombivli : इरशाळवाडीत ट्रेक करताना अचानक काय घडलं? डोंबिवलीच्या २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT