Gold Silver Price Today (30th October) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Price Today (30th October): सोन्याचा भाव गगनाला! महिन्याभरात ४००० रुपयांनी वाढ, जाणून घ्या आजचे दर

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (30th October):

सणासुदीच्या काळात सोनं मोठ्या प्रमाणात खरेदी केले जाते. परंतु, दसऱ्यापूर्वीच सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे दिवाळीतही सोनं महागणार का? असा प्रश्न खरेदीदारांना पडला आहे.

देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या आठवड्याभरात आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती प्रति तोळ्यानुसार $2,000 च्या वर गेली आहे. यापूर्वी प्रति तोळ्यानुसार सोनं हे $1,900 इतके होते. आखाती देशातील युद्धांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारावर याचा परिणाम पाहायला मिळाला आहे. परंतु, आज सोन्याच्या दरात किंचित घट झालेली पाहायला मिळाली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ऑक्टोबर महिन्यात अवघ्या २५ दिवसांमध्ये सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 4,150 रुपयांची वाढ झाली आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, मुंबईत सोन्याचा भाव 3 ऑक्टोबर रोजी 56,675 रुपये प्रति 10 ग्रॅम होता तो 27 ऑक्टोबर रोजी 60,825 रुपये झाला.

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,७३५ रुपये मोजावे लागणार आहेत तर २४ कॅरेटनुसार १ तोळ्यासाठी ६२,५५० रुपये मोजावे लागणार आहे. आज २४ कॅरेटनुसार सोन्याच्या भावात मागील दरानुसार २३० रुपयांनी घट झालेली पाहायला मिळाली. तर चांदीच्या (Silver) किमतीत वाढ झाली आहे. आज १ किलो चांदीसाठी ७५,६०० रुपये (Price) मोजावे लागणार आहेत.

महाराष्ट्रातील (Maharashtra) प्रमुख शहरात आज मुंबई-पुणे आणि नागपूरमध्ये २४ कॅरेट सोन्यासाठी ६२,४०० रुपये मोजावे लागणार आहे. तर ठाण्यातही भाव सारखाच आहे. नाशिकमध्ये आज २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६२,४३० रुपये मोजावे लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री...' बाळासाहेब थोरातांनी सांगितली 'मन की बात'; राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या

BARC Recruitment: भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT