Gold Silver Rate (13th December 2023) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate (13th December 2023): सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी! आठवड्याभरात ३००० हजार रुपयांनी भावात घसरण, जाणून घ्या आजचा दर

Today's (13th December 2023) Gold Silver Rate In Maharashtra: सोन्याच्या भावात मागील ६ ते ७ दिवसांपासून घसरण पाहायला मिळत आहे. यामध्ये मागील आठवड्याभरात ३००० रुपयांनी घसरण झाली आहे. या घसरणीमुळे लग्नसराईच्या काळात सोन्याच्या मागणीत वाढ झालेली पाहायला मिळाली.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (13th December 2023):

भारतात लग्नसराईचा काळ सुरु झाल्यावर सोन्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहे. अशातच सोन्याची मागणी झपाट्याने वाढली आहे. ४ डिसेंबरला सोन्याने $2150 चा उच्चांक गाठून विक्रमी नोंद केली होती. घसरणीनंतर आता $1975 वर येऊन पोहोचला आहे.

सोन्याच्या (Gol) भावात मागील ६ ते ७ दिवसांपासून घसरण पाहायला मिळत आहे. यामध्ये मागील आठवड्याभरात ३००० रुपयांनी घसरण झाली आहे. या घसरणीमुळे लग्नसराईच्या काळात सोन्याच्या मागणीत वाढ झालेली पाहायला मिळाली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

RIBJA चे नॅशनल सेक्रेटरी सुरेंद्र मेहता म्हणाले की, येत्या काही दिवसात सोन्याचा भाव आणखी घसरण्याची शक्यता आहे. तर पुढल्या वर्षी ७० ते ८० हजारांवर दर पोहोचू शकतो. मागच्या सहा महिन्यांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे.

आज सकाळच्या सत्रात सोन्याचा भाव नरमला आहे. ११० रुपयांनी २४ कॅरेटनुसार घसरण झाली आहे. तर चांदीच्या किंमतीतही ७० रुपयांनी पतझड पाहायला मिळाली.

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,६८० रुपये मोजावे लागणार आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६१,९५० रुपये मोजावे लागतील. तसेच चांदीच्या किमतीही (Price )घसरल्या आहेत. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७५,००० रुपये मोजावे लागतील. (Gold Silver Price Today In Marathi)

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (Gold Rate)

  • मुंबई (Mumbai)- ६१,८०० रुपये

  • पुणे - ६१,८००रुपये

  • नागपूर - ६१,८००रुपये

  • नाशिक - ६१,८०० रुपये

  • ठाणे - ६१,८०० रुपये

  • अमरावती - ६१,८०० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Fort : १५ ऑगस्टला फिरण्याचा प्लान करताय? देशभक्तीची भावना जागवणाऱ्या 'या' ऐतिहासिक स्थळांना नक्की भेट द्या

Maharashtra News Live Update : आंबोली-चौकुळच्या सड्यावर कोल्ह्यांच्या कळपाचा मुक्त खेळ

Fitness Tips: जिमला जाण्याची गरज नाही! फिट आणि अॅक्टिव्ह राहण्यासाठी ‘या’ ७ सवयी लावा

Mumbai Police: ड्रग्ज खरेदी करताना पोलिसाला अटक, मुंबई पोलिस दलात खळबळ

Independence Day Marathi Speech : १५ ऑगस्टला भाषण देताय? हे 10 मुद्दे लक्षात ठेवा; भाषण ऐकून सर्वच करतील कौतुक!

SCROLL FOR NEXT