Gold Silver Rate (11th December 2023) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate (11th December 2023): खरेदीदारांना दिलासा! सोन्याच्या दरात आठवड्याभरात २००० रुपयांनी घसरण, आजचा भाव किती?

Today's (11th December 2023) Gold Silver Rate In Maharashtra: सणोत्सवाच्या काळात गुंतवणुकीदारांसाठी अधिक नफ्याचा ठरला. दिवाळी पाठोपाठ लग्नसराईच्या हंगामात सोन्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळाली.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (11th December 2023):

सणोत्सवाच्या काळात गुंतवणुकीदारांसाठी अधिक नफ्याचा ठरला. दिवाळी पाठोपाठ लग्नसराईच्या हंगामात सोन्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळाली. परंतु, मागील दीड- दोन वर्षांपासून जागतिक अर्थव्यवस्थेत मध्यवर्ती बँकांकडून जोरदार व्याजदर वाढीचे सत्र सुरु राहिल्यामुळे सोने-चांदी मंदीच्या विळख्यात राहिली.

अशातच मागच्या सहा महिन्यापासून सोन्या-चांदीच्या दरात पतझड पाहायला मिळाली आहे. मागच्या सोमवारी सोन्याच्या (Gold) भावाने विक्रम केला होता. १० टक्क्यांनी उसळी घेऊन दहा ग्रॅमसाठी ६४००० रुपयांची विक्रमी पातळी ओलांडली होती. अशातच आठवड्याच्या अखेरीस सोन्याचा भाव हा ६१,६०० रुपयांवर येऊन थांबला.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एमसीएक्सवरील या किमतीनुसार सोन्याच्या दरात मागील आठवड्यापासून २४०० रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळाली. आजही सोन्याचा भाव काही प्रमाणात नरमला आहे.

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,७०५ रुपये मोजावे लागणार आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६१,२३० रुपये मोजावे लागतील. तसेच चांदीच्या किमतीही (Price )घसरल्या आहेत. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७५,८०० रुपये मोजावे लागतील. (Gold Silver Price Today In Marathi)

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (Gold Rate)

  • मुंबई (Mumbai)- ६२,१३० रुपये

  • पुणे - ६२,१३० रुपये

  • नागपूर - ६२,१३० रुपये

  • नाशिक - ६२,३८० रुपये

  • ठाणे - ६२,१६० रुपये

  • अमरावती - ६२,१३० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Fort : १५ ऑगस्टला फिरण्याचा प्लान करताय? देशभक्तीची भावना जागवणाऱ्या 'या' ऐतिहासिक स्थळांना नक्की भेट द्या

Maharashtra News Live Update : आंबोली-चौकुळच्या सड्यावर कोल्ह्यांच्या कळपाचा मुक्त खेळ

Fitness Tips: जिमला जाण्याची गरज नाही! फिट आणि अॅक्टिव्ह राहण्यासाठी ‘या’ ७ सवयी लावा

Mumbai Police: ड्रग्ज खरेदी करताना पोलिसाला अटक, मुंबई पोलिस दलात खळबळ

Independence Day Marathi Speech : १५ ऑगस्टला भाषण देताय? हे 10 मुद्दे लक्षात ठेवा; भाषण ऐकून सर्वच करतील कौतुक!

SCROLL FOR NEXT