Today's Gold Silver Rate Saam TV
बिझनेस

Today's Gold Silver Rate : सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचा भाव घसरला; वाचा तुमच्या शहरातील नवे दर

(1st May 2024) Gold Silver Price In Maharashtra: आज २४ कॅरेट सोन्याचे दर १०९० रुपयांनी घसरले आहेत. प्रति तोळा सोन्यात ही घसरण झाली असून आज ७१,६६० रुपयांनी सोनं विकलं जातंय.

Ruchika Jadhav

एप्रिल महिन्यात सोन्याचे भाव मोठ्याप्रमाणावर वाढले होते. अशात आज १ मे कामगार दिनी सोन्याच्या दरांत घसरण झाल्याचं दिसत आहे. लग्न सराईमुळे अनेक नागरिकांसाठी ही दिलासादायक बाब आहे.

सलग तीन आठवड्यांनंतर सोन्याचे दर कमी झालेत. काल देखील सोन्याचा भाव घसरला त्यानंतर आज सुद्धा तब्बल १ हजार रुपयांनी सोन्याचे दर कमी झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून जगभरात काही देशांमध्ये युद्ध सुरू आहेत. यामुळे सोन्यासह विविध गोष्टींवरी भाव वाढताना दिसत होता. मात्र आता मोठ्या प्रमाणावर दर घसरलेत.

२२ कॅरेट सोन्याचा भाव

भारतात आज सोन्यामध्ये १००० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा २२ कॅरेट सोन्याचा भाव ६५,५५० रुपयांवर पोहचलाय. तर १०० ग्राम सोन्याच्या दरात १०,००० रुपयांची घसरण होऊन आजचा भाव ६,५७,००० इतका आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव

भारतात आज २४ कॅरेट सोन्याचे दर १०९० रुपयांनी घसरले आहेत. प्रति तोळा सोन्यात ही घसरण झाली असून आज ७१,६६० रुपयांनी सोनं विकलं जातंय. १०० ग्रॅम सोन्यामागे १०,९०० रुपयांची घट झाली असून ७,१६,६०० रुपयांवर सोन्याचा भाव पोहचला आहे.

चार प्रमुख महानगरांमधील सोन्याचे दर

चेन्नईमध्ये आज २४ कॅरेट सोन्याची किंमत ७२,३८० रुपये आहे. तर २२ कॅरेट सोन्याची किंमत ६६,३५० रुपये इतकी आहे.

मुंबईमध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत ७१,५१० रुपये आहे. तर २२ कॅरेट सोन्याची किंमत ६५,५५० रुपये इतकी आहे.

दिल्लीमध्ये आज २४ कॅरेट सोन्याची किंमत ७१,६६० रुपये आहे. तर २२ कॅरेट सोन्याची किंमत ६५,७०० रुपये इतकी आहे.

कोलकत्तामध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत ७१,५१० रुपये आहे. तर २२ कॅरेट सोन्याची किंमत ६५,५५० रुपये इतकी आहे.

पुण्यातील सोन्याच्या किंमती

पुण्यामध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ७१,५१० रुपये इतका आहे. तर २२ कॅरेट सोनं ६५,५५० रुपयांनी विकलं जातंय. १८ कॅरेट सोनं ५३,६३० रुपयांनीआ आज विकलं जात आहे.

चांदीचे दर

आज चांदीच्या दरामध्ये देखील घसरण झाली आहे. प्रति किलो चांदीच्या दरात ५०० रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे आज १ किग्रा चांदीची किंमत ८३,००० रुपये इतकी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Janhvi Kapoor: चंद्रावाणी मुखडा तिचा...; जान्हवी कपूरचा दहीहंडी स्पेशल लूक पाहिलात का?

Maharashtra Live News Update: जांभोरा येथील पाझर तलाव फुटला, शेतीचे मोठं नुकसान

Shirdi : दहीहंडीच्या मिरवणुकीत हत्येचा थरार, जुन्या वादातून मित्रांकडून १८ वर्षीय तरुणाची हत्या

Elvish Yadav House Firing: धावत धावत आले अन् धाड धाड धाड झाडल्या दोन डझनभर गोळ्या, गोळीबाराचा CCTV व्हिडिओ व्हायरल

Sakshee Gandhi: थोडीशी लाजली अन् गालातच हसली; अभिनेत्रीचं मोहक सौंदर्य

SCROLL FOR NEXT