Today's Gold Silver Rate, (10th April 2024) Gold Silver Price In Maharashtra Saam Tv
बिझनेस

Today's Gold Silver Rate : सोनं ७२ हजारांच्या पल्ल्याड, चांदीनंही भाव खाल्ला, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

कोमल दामुद्रे

24k Gold Silver Rate In Maharashtra:

गुढीपाडव्यापूर्वी सोन्याच्या दराने उच्चांक पातळी गाठली होती. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला मंगळवारी सोने ९०० रुपयांनी वधारुन ७२,२०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले होते.

सोन्याच्या भावात वाढ होत असतानाही बाजारात ग्राहकांचा उत्साह दिसला. तर चांदीच्या भावात १०० रुपयांची घसरण होऊन ८२,९०० रुपये प्रति किलोवर राहिली. १ एप्रिलला ६९, ४०० रुपये असलेल्या सोन्याच्या भावात ९ दिवसात दोन हजार ८०० रुपयांची वाढ झाली.

लग्नसराईच्या काळात दागिन्यांना अधिक मागणी असते. अशातच एमसीएक्सवर आणि कॉमेक्सवर सोन्याने उच्चांक पातळी गाठली आहे. आज महाराष्ट्रात सोन्याचा -चांदीचा भाव किती जाणून घेऊया.

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ६,६२५ रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ७२,२६० रुपये (Price) मोजावे लागणार आहे. आज सोन्याच्या (Gold) भावात ३८० रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. तसेच आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ८५,५०० रुपये मोजावे लागतील. तर चांदीच्या भावात १००० रुपयांनी वाढ झाली आहे.

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (24k Gold Rate Today)

  • मुंबई- ७२,११० रुपये

  • पुणे - ७२,११० रुपये

  • नागपूर - ७२,११० रुपये

  • नाशिक - ७२,१४० रुपये

  • ठाणे - ७२,११० रुपये

  • अमरावती - ७२,११० रुपये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT