Today's Gold Silver Rate, (5th April 2024) Gold Silver Price In Maharashtra Saam Tv
बिझनेस

Today's Gold Silver Rate : सोन्याच्या भावात किंचित घसरण, चांदीही नरमली; जाणून घ्या प्रमुख शहरातील आजचे दर

(5th April 2024) Gold Silver Price In Maharashtra: देशांतर्गत बाजारात सोन्याच्या भावाने गुरुवारी सर्वाकालिन उच्चांक पातळी गाठली. लग्नसराईचा काळ असल्यामुळे धातूच्या किमतीत मोठा बदल झालेला पाहायला मिळाला आहे. त्यामुळे खरेदीदारांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे.

कोमल दामुद्रे

24k Gold Silver Rate In Maharashtra:

देशांतर्गत बाजारात सोन्याच्या भावाने गुरुवारी सर्वाकालिन उच्चांक पातळी गाठली. लग्नसराईचा काळ असल्यामुळे धातूच्या किमतीत मोठा बदल झालेला पाहायला मिळाला आहे. त्यामुळे खरेदीदारांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे.

काल मुंबईच्या झवेरी बाजारात घाऊक व्यवहारात सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ७०,४७० रुपयांवर होता. तर किरकोळ बाजारात कर आणि इतर घटकांच्या समावेशासह ७१ हजारांची पातळी ओलांडली आहे.

मागच्या सहा सत्रांत सोन्याच्या भावात वाढ होताना दिसून येत आहे. एमसीएक्स आणि कॉमेक्सवर सोन्याने उच्चांक पातळी गाठली आहे. लग्नसराईचा काळ असल्यामुळे सोन्याच्या दराला प्रचंड मागणी आहे. जगभरातील केंद्रीय बँकांकडून सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच २०२४ मध्ये जगात आर्थिक मंदीची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याच्या भावात बदल होताना दिसून आले.

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ६,४३० रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ७०,१३० रुपये (Price) मोजावे लागणार आहे. आज सोन्याच्या (Gold) भावात ४९० रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. तसेच आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ८२,७०० रुपये मोजावे लागतील. तर चांदीच्या भावात ३०० रुपयांनी वाढ झाली आहे.

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (24k Gold Rate Today)

  • मुंबई- ६९,९८० रुपये

  • पुणे - ६९,९८० रुपये

  • नागपूर - ६९,९८० रुपये

  • नाशिक - ७०,०१० रुपये

  • ठाणे - ६९,९८० रुपये

  • अमरावती - ६९,९८० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

Pregnancy Tips : गर्भावस्थेतील मधुमेह नियंत्रणात ठेवणे का आवश्यक आहे?

Pandharpur: डॉल्बीच्या आवाजामुळे एकाचा मृत्यू, दंहीहंडीचा कार्यक्रम पाहायला आला अन्...; पंढरपुरात खळबळ

Hair Loss Remedie : टक्कल पडण्याची समस्या? हे घरगुती उपाय करतील मदत

Rahul Gandhi: व्होट चोरीवरून टोकदार प्रश्न, निवडणूक आयोगानं दिली उत्तरं; तुम्ही समाधानी आहेत का?

SCROLL FOR NEXT