Gold Silver Price Today saam tv
बिझनेस

Gold- Silver Price: सोन्याला पुन्हा चकाकी! १० तोळे १२००० रुपयांनी महागले; २४-२२ कॅरेटचे आजचे दर किती?

Gold Silver Price Today: सोनं-चांदीच्या दराबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आज सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात काहीच बदल झाला नाही. सोनं-चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी वाचा आजचे दर...

Priya More

Summary -

  • सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे

  • २४, २२ आणि १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी वाढ

  • २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरात १२,००० रुपयांची वाढ

  • आज चांदीचा दर स्थिर आहेत

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून कमी होणाऱ्या सोन्याच्या दरात आज मोठी वाढ झाली आहे. सोन्याचे दर कमी झाल्यामुळे ग्राहकांचा सोनं खरेदीकडे कल वाढला होता. ते आणखी सोन्याचे दर कमी होण्याची वाट पाहत होते. पण आज सोन्याच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. आज २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल १२,००० रुपयांनी वाढ झाली आहे. जर आज तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी जाणार असाल तर आजचे २४, २२ आणि १८ कॅरेटचे दर किती ते एकदा वाचून जा...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर १,२०० रुपयांनी वाढले आहेत. आज २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदीसाठी १,२२,२६० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १२,००० रुपयांनी वाढ झाली असून हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १२,२६,८०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. सोन्याच्या दरात वाढ झाल्यामुळे नागरिकांच्या खिशाला कात्री लागत आहे.

२४ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १,१०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,१२,४५० रुपये मोजावे लागणार आहे. हे सोनं काल १,११,३५० रुपयांना विकले गेले. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल ११,००० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला ११,२४,५०० रुपये खर्च करावे लागतील. हेच सोनं काल ११,२४,५०० रुपयांना विकले गेले.

२४ आणि २२ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील चांगलीच वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ९०० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ९२,०१० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ९,००० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ९,२०,१०० रुपये मोजावे लागतील. काल हेच सोनं खरेदीसाठी ९,२०,१०० रुपयांना विकले गेले.

तर सोन्याच्या दरात वाढ झाली असली तर चांदीच्या दरात कोणतीही वाढ झाली नाही. चांदीचे दर आहे तसेच आहेत. चांदीच्या दरात आज काहीच बदल झाला नाही. आज १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी १५१ पये मोजावे लागणार आहेत. तर १ किलो चांदीचे दर १,५१,००० रुपये इतका आहे. चांदीच्या दरात काहीच वाढ न झाल्यामुळे आज तुम्ही चांदी खरेदी करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Arya Encounter Mystery: रोहित आर्यचा एन्काऊंटर की हत्या? रोहितच्या वकिलाच्या दाव्यानं खळबळ

Sikandar Shaikh Arrest: पहिलवान सिकंदर शेखला अटक; पोलिसांच्या कारवाईने कुस्ती क्षेत्रात खळबळ|VIDEO

Mumbai Crime : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; बीएमसी अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक

वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताची धडक, 7 वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाचा चारली धुळ

Crime News : आई की कसाई? बॉयफ्रेंडसाठी एकुलत्या एक मुलाची हत्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT