गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सणासुदीच्या काळात सराफा बाजारात पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे लग्नसराई, सण किंवा गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांच्या बजेटवर परिणाम होण्याची शक्यता आहे. आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल १,२०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे १ तोळा म्हणजेच १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर आता १,५५,५१० रुपये इतका झाला आहे. सोन्याच्या दरातील या वाढीमुळे ग्राहकांना खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
दुसरीकडे, चांदीच्या दरातही मोठी तेजी पाहायला मिळाली आहे. आज १,००० ग्रॅम चांदीच्या दरात ५,००० रुपयांची वाढ झाली आहे. सणासुदीच्या काळात मौल्यवान धातूंच्या दरात झालेली ही वाढ गुंतवणूकदारांसाठीही महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान, ग्राहकांना २४ कॅरेटसोबतच २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचे आजचे दर किती आहेत, हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी आजचे ताजे दर आणि बाजारातील बदल जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.
१ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १५,५५१
८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,२४,४०८
१० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,५५,५१०
१०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १५,५५,१००
१ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १४,२५५
८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,१४,०४०
१० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,४२,५५०
१०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १४,२५,५००
१ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ११,६६३
८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ९३,३०४
१० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,१६,६३०
१०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर ११,६६,३००
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.