सोन्याच्या दरात आज ₹७७० ची घसरण
१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ₹१,६२,९८० वर
२२ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅम भाव ₹१,४९,४००
सोन्याच्या खरेदीदारांसाठी काहीसा दिलासा
गेल्या आठवड्याभरात सोने आणि चांदीच्या दरात मोठी तेजी पाहायला मिळाली होती. अमेरिकन डॉलर आणि बाँड यील्डमध्ये झालेल्या घसरणीचा परिणाम सोन्याच्या किमतीवर झाला आणि दरात सातत्याने वाढ झाली. मात्र आता सोन्याच्या दरात काहीशी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात ७७० रुपयांची घट झाली असून, १ तोळा म्हणजेच १० ग्रॅम सोन्याचा भाव १,६२,९८० रुपयांवर आला आहे.
सोन्याच्या दरातील या घसरणीमुळे खरेदीदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. विशेषतः लग्नसराई किंवा गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरू शकतो. दरम्यान, २२ कॅरेट सोन्याचा भाव २४ कॅरेटपेक्षा कमी असून, १८ कॅरेट सोन्याचे दर त्याहून कमी आहेत. त्यामुळे सोन्याची खरेदी करण्यापूर्वी आजचे २२ कॅरेट, २४ कॅरेट आणि १८ कॅरेटचे ताजे दर जाणून घेणे महत्त्वाचे आहे. बाजारातील बदलांनुसार सोन्याच्या किमतीत पुढील काळातही चढ-उतार होण्याची शक्यता आहे.
१ ग्रॅम: आजचे दर १६,२९८
८ ग्रॅम: आजचे दर १,३०,३८४
१० ग्रॅम: आजचे दर १,६२,९८०
१०० ग्रॅम: आजचे दर १६,२९,८००
१ ग्रॅम: आजचे दर १४,९४०
८ ग्रॅम: आजचे दर १,१९,५२०
१० ग्रॅम: आजचे दर १,४९,४००
१०० ग्रॅम: आजचे दर १४,९४,०००
१ ग्रॅम: आजचे दर १२,२२४
८ ग्रॅम: आजचे दर ९७,७९२
१० ग्रॅम: आजचे दर १,२२,२४०
१०० ग्रॅम: आजचे दर १२,२२,४००
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.