Gold Rate Today saam tv
बिझनेस

Gold Rate : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी खुशखबर, २२ कॅरेटचं सोनं ₹१६५० रूपयांनी स्वस्त!

Today's Gold Rate: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना दिलासा! १० तोळे २२ कॅरेट सोन्याची किंमत ₹१६,५०० ने कमी झाली आहे. २४ कॅरेटचे सोने आणि चांदीच्या किमतीतही मोठी घसरण झाली आहे. जाणून घ्या आजचे दर.

Namdeo Kumbhar

Today Gold Rate in Marathi : लग्नसराईच्या हंगामात सोनं आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण होत आहे. भारत-पाक तणाव आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीमुळे गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात थोडी चढ-उतार दिसून येत होती. पण आता सोन्याचे दर कमी झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. २२ आणि २४ कॅरेटच्या सोन्याचा भाव खाली उतरले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये शस्त्रसंधी झाली, चीन अमेरा यांच्यातील ट्रेड डीलमुळे डॉलर इंडेक्समध्ये मजबुती मिळाली आहे. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे भावात घसरण पाहायला मिळाली. पाहूयात goodreturns संकेतस्थळावर १८,२२ आणि २४ कॅरेटच्या सोन्याची किंमत किती आहे.

22 कॅरेट सोन्याचे दर झाले स्वस्त

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी २२ कॅरेट सोनं प्रति १० तोळा १,६५० रूपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे प्रतितोळा सोन्याच्या किंमत ८८,९५० रूपये इतकी झाली आहे. १० तोळे म्हणजेच १०० ग्राम सोने १६,५०० रूपयांनी स्वस्त झालेय. १० तोळे सोन्यासाठी आज ८,८९,५०० इतके रूपये मोजावे लागतील. शनिवारी सोन्याच्या किंमतीत वाढ पाहायला मिळाली होती. २२ कॅरेटच्या १० तोळं सोन्यासाठी शनिवारी ९,०६,००० इतके रूपये मोजावे लागत होते. आता हेच सोनं ८,८९,५०० रूपये इतके झालेय.

१८ कॅरेट सोन्याची किंमतीतही घसरण झाली असून प्रति तोळा १,३५० रूपये कमी झाले आहे. एक तोळ्यासाठी आता ७२,७८० रूपये मोजावे लागणार आहेत.

२४ कॅरेट सोन्याची किंमत किती घसरली- (24K Gold Price Today in marathi)

24 कॅरेटच्या सोन्याच्या किमतीतही मोठी घसरण झाली आहे. एक तोळा सोनं १८०० रूपयांनी स्वस्त झाले आहे. सोमवारी सराफा बाजारात २४ कॅरेट एक तोळा सोन्याची किंमत ९७,०३० रूपये इथकी झाली आहे. तर १० तोळे सोन्याची किमत १८००० रूपयांनी घसरून ९,७०,३०० रूपये इतकी झाली आहे.

चांदीची किमतही घसरली - (Silver Rate in marathi)

सराफ बाजारात सोनं आणि चांदीची किंमत घसरली आहे. १०० चांदीची किंमत ११० रूपयांनी घसरली आहे. एक किलो सोनं ११०० रूपयांनी स्वस्त झाले आहे. एक किलो चांदीची किंमत ९७९०० रूपये इतकी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

Mithila Palkar: मिथिला पालकरचं वय वाढतय अन् सौंदर्यही खुलतय...

SCROLL FOR NEXT