Gold Rate Today Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: ...म्हणून सोन्याचे दर पुन्हा वाढले, प्रति तोळा इतक्या रुपयांवर पोहचले, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Gold Rate Today Hike: जळगावच्या सराफा बाजारपेठेत सोन्याचे दर आज पुन्हा वाढले आहेत. सोन्याच्या दरात एका दिवसात ३ हजारांची वाढ झाली आहे. सोन्याचे दर वाढल्याने खरेदीदारांच्या खिशाला फटका बसला आहे.

Siddhi Hande

सोन्याच्या दरात पुन्हा वाढ

सोनं १.५० लाखांच्या पार

सोन्याचे दर वाढल्याने खरेदीदारांच्या खिशाला फटका

संजय जाधव, साम टीव्ही प्रतिनिधी

लग्नसराईच्या हंगामात जळगावच्या सुवर्णनगरीत सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल साडेतीन हजार रुपयांची वाढ झाली होती. चांदीच्या दरातही सुमारे तीन हजार रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. यामुळे ऐन खरेदीच्या काळात ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.

आजचे सोन्याचे दर (Gold Rate Today)

सध्याच्या घडीला जीएसटीसह सोन्याचा दर एक लाख 54 हजार रुपयांवर पोहोचला आहे. चांदीचा दर 2 लाख 50 हजार 300 रुपयांपर्यंत गेला आहे. दरवाढीमुळे बाजारात खरेदीचा वेग काहीसा मंदावल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र, अशा परिस्थितीतही लग्नसराईमुळे आवश्यक खरेदी टाळणे ग्राहकांना शक्य होत नाही.

सोने-चांदीचे दर का वाढले? (Why Gold Silver Price Increase)

दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींचा थेट परिणाम स्थानिक बाजारावर होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थिती आणि त्यातील चढ-उतार यामुळे सोने-चांदीच्या दरात वाढ होत आहे युद्ध थांबण्याचे संकेत मिळताच गुंतवणूकदारांचा कल पुन्हा सोन्याकडे वाढत आहे. त्यामुळे दरवाढीला अधिक चालना मिळत असल्याचे सुवर्णतज्ज्ञांनी स्पष्ट केले.एकंदरीत, लग्नसरायच्या पार्श्वभूमीवर वाढलेले दर आणि अस्थिर बाजारपेठ यामुळे ग्राहकांसमोर मोठे आर्थिक आव्हान उभे राहिले आहे.

सोन्याचे दर हे दीड लाखांपेक्षा जास्त झाले आहे. मागच्या आठवड्यात हे दर १ लाख ४० हजारांवर आले होते. त्यामुळे ग्राहकांनी सोनं खरेदीसाठी पसंती दर्शवली होती. मात्र, आता हे दर पुन्हा वाढल्याने मोठा ग्राहकांसमोर मोठा प्रश्नच निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High blood pressure: हाय बीपीचा त्रास एका रात्रीत होत नाही; शरीरात दिसतं हे 1 सायलेंट लक्षण

Sonam Wangchuk: 'अन्यायापासून ते मुक्तीपर्यंत...' सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून पहिला मेसेज, २० जुलैसाठी देशवासियांना आवाहन

Maharashtra News Live Update: हायकोर्टाचा दणका अन् पोलिसांचा अॅक्शन मोडवर, शास्त्रीनगर मारहाण प्रकरणातील पाचवी महिला आरोपी अटकेत

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! पगार, DA आणि पेन्शनमध्ये होणार मोठा बदल

Health Tips After 40: वयाच्या 40 नंतर या 8 सवयी लगेचच बदला; अन्यथा आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT