Gold Rate Today Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: सणासुदीच्या तोंडावर सोनं महागलं; प्रति तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये; २२ अन् २४ कॅरेटचे ताजे दर

Gold Rate Today Hike: सोन्याचे दर आज पुन्हा एकदा वाढले आहेत. अक्षय्य तृतीयेच्या तोंडावर सोन्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे.

Siddhi Hande

सोन्याचे दर पुन्हा वाढले

अक्षय्य तृतीयेआधी सोन्याच्या दरात वाढ

वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

अक्षय्य तृतीयेच्या आधी सोन्याचे दर वाढले आहेत. सलग दोन दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ होत आहे. आजदेखील सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आज प्रति तोळ्यामागे २२० रुपयांची वाढ झाली आहे. अक्षय्य तृतीयेच्या तोंडावर सोन्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर चांगलाच परिणाम होणार आहे. सोन्याचे दर सतत वाढत असल्याने ग्राहकांना टेन्शन आले आहेत. आज सोन्याचे दर कितीने वाढले ते जाणून घ्या.

सोन्याचे दर किती? (Gold Rate Today)

आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात २२० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर १,५५,५७० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे १७६ रुपयांची वाढ झाली असून हे दर १,२४,४५६ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर २,२०० रुपयांनी वाढले असून हे दर १५,५५,७०० रुपये झाले आहेत.

२२ कॅरेटचे दर (22K Gold Rate)

आज २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे २०० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर आज १,४२,६०० रुपये आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर १६० रुपयांनी महागले असून १,१४,०८० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे २००० रुपयांची वाढ झाली असून हे दर १४,२६,००० रुपये झाले आहेत.

१८ कॅरेटचे दर (18K Gold Rate)

१८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १७० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,१६,६८० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोनं १३६ रुपयांनी महागलं असून हे दर ९३,३४४ रुपये झाले आहे. १० तोळ्यामागे सोन्याचे दर १,७०० रुपयांनी वाढले आहेत. हे दर ११,६६,८०० रुपये झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SBI Recruitment: बँकेमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, SBI मध्ये २०७ पदांसाठी भरती; लाखो रुपये मिळवा पगार

Maharashtra News Live Update: सत्ताधारी पक्षाच्या माजी महापौरांचे उपायुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या

Gavar Side Effects : गवार खाणं 'या' लोकांसाठी ठरू शकत धोकादायक! 'ही' ६ कारणे वेळीच घ्या जाणून

Konkan Forts : समुद्राच्या लाटांपासून जंगलाच्या कुशीत, कोकणातील 'हे' ५ किल्ले आहेत खूपच खास

LPG Cylinder : शहरी आणि ग्रामीण भागातल्या LPG ग्राहकांना दुसरा गॅस सिलिंडर कधी बुक करता येणार? नवीन अपडेट समोर

SCROLL FOR NEXT