Gold price today in Jalgaon without GST saam tv
बिझनेस

Gold Rate : दसऱ्याआधी सोन्याच्या दरात वाढ! नवमीला सोन्याचे भाव वधारले; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर

Gold Price Today : दसऱ्याआधी नवमीच्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,४८,०४० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १,३५,७०० रुपयांवर पोहोचला आहे. १८ कॅरेट सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे.

Namdeo Kumbhar

दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याची खरेदी करणे आपल्याकडे अत्यंत शुभ मानले जाते. मात्र, दसऱ्याचा सण अवघ्या एका दिवसावर आलेला असतानाच सोनं खरेदी करू इच्छिणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसला आहे. नवमीच्या दिवशीच सोन्याच्या दरात किंचित वाढ झाल्याची नोंद झाली आहे. आज सकाळी सराफा बाजार उघडताच सोन्याच्या भावात वाढ पाहायला मिळाली. २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा ₹1,48,040 इतक्या रूपयांवर पोहचले आहेत. त्यामुळे खरेदीदारांना आता थोडा जादा खिसा रिकामा करावा लागणार आहे.

आज सराफा बाजारातील नव्या दरानुसार २४ कॅरेट सोन्याच्या भावात प्रति तोळा ३८० रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,४८,०४० रुपयांवर पोहोचला आहे. तर प्रति १ ग्रॅमसाठी हा दर १४,८०४ रुपये झाला आहे. दागिन्यांसाठी सर्वाधिक पसंती असलेल्या २२ कॅरेट सोन्याच्या दरातही प्रति १० ग्रॅम ३५० रुपयांची वाढ झाली. २२ कॅरेट सोन्याचा दर १,३५,७०० रुपये झाला आहे. १८ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम २९० रुपयांची वाढ होऊन तो १,११,०३० रुपयांवर स्थिरावला आहे.

सण-उत्सवाच्या काळात आणि लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या मागणीत मोठी वाढ होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि स्थानिक बाजारातील वाढती मागणी यामुळे सोन्याचे दर वधारल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सोन्याची खरेदी करण्याच्या तयारीत असलेल्या ग्राहकांसाठी ही वाढ काहीशी चिंताजनक असली, तरी मुहूर्ताची खरेदी करण्यासाठी नागरिक अजूनही सराफा दुकानांमध्ये गर्दी करत आहेत.

गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण नोंदवण्यात आली होती. पण आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याची किंमत वाढली आहे. २० ऑक्टोबर रोजी देशभरात दसऱ्याचा सण साजरा केला जातो. दिवाळी पाडवा आणि दसरा, या दोन दिवशी सोन्याची खरेदी करणं शुभ मानले जाते. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात ग्राहकांची पावले सोन्याच्या दुकानाकडे वळतात. पण आता दरात वाढ झाली आहे. दसऱ्याला सोन्याची किंमत स्वस्त होणार की वाढणार.. याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT