Gold Rate Today saam tv
बिझनेस

Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचे दर वाढले; २४ अन् २२ कॅरेटचे भाव किती? वाचा सविस्तर

Gold Rate Today Hike: आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचे दर वाढले आहेत. सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे ८२० रुपयांनी वाढ झाली आहे.

Siddhi Hande

सोन्याच्या दरात वाढ

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी प्रति तोळ्यामागे ८२० रुपयांनी वाढ

आजचे भाव किती?

आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सोन्याचे दर १ लाख १२ हजार रुपये प्रति तोळा आहे. सोन्याने उच्चांक गाठला आहे.

सणासुदीचे दिवस सुरु आहे. दोन दिवसात नवरात्र आहे त्यानंतर दसरादेखील आहे. या काळात अनेकजण चांगला मूहूर्त साधत सोन्याचे दागिने खरेदी करतात. मात्र, सोन्याच्या दराने उच्चांक गाठल्याने ग्राहकांनी सोनं खरेदीकडे पाठ फिरवली आहे. सोन्याचे दर वाढल्याने ग्राहकांना मात्र सोने खरेदी करावे की नाही असा प्रश्न पडला आहे.

आज सोन्याचे दर वाढले (Gold Rate Hike Today)

आज २० सप्टेंबरला सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे ८२० रुपयांनी वाढ झाली आहे. २४ कॅरेटच्या सोन्यात वाढ झाली आहे. १ तोळा सोन्याचे दर १,१२,१५० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ६५६ रुपयांनी वाढले असून हे दर ८९,७२० रुपये आहेत.१० तोळा सोन्याचे दर ८२०० रुपयांनी वाढले असून आज ११,२१,५०० रुपये किंमत आहे.

२२ कॅरेटचे दर (22k Gold Rate)

आज २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे ७५० रुपयांनी वाढ झाली आहे. हे दर १,०२,८०० रुपये आहेत. ८ ग्रॅममागे ६०० रुपयांची वाढ होऊन हे दर ८२,२४० रुपये आहेत. १० तोळे सोन्याचे दर १०,२८,००० रुपये आहे. या दरात ७५०० रुपयांची घसरण झाली आहे.

१८ कॅरेट सोन्याचे दर

आज १८ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे ६१० रुपयांनी वाढ झाली आहे. हे दर ८४,११० रुपये आहेत. ८ ग्रॅमच्या दरात ४८८ रुपयांनी वाढ होऊन हे दर ६७,२८८ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे ६१०० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर ८,४१,१०० रुपये झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs RR, IPL 2026: वैभव सूर्यवंशीची फटकेबाजी अन् आर्चरच्या भेदक गोलंदाजी पुढे हैदराबाद गारद; आता गुजरातशी भिडणार राजस्थान

नागपूरमध्ये इबोलाचा अलर्ट; युगांडावरून आलेला नागरिक होम आयसोलेशनमध्ये

Mumbai Crime: मुंबईत रक्तरंजित थरार! रिक्षाचालक समजून दुसऱ्यालाच संपवलं, धारदार शस्त्राने वार करत हत्या

ठाणेकरांची चिंता वाढली; बारवी धरणात फक्त इतकाच पाणीसाठा शिल्लक

Accident: भरधाव डंपरची रिक्षाला धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT