Today Gold Rate Saam Tv
बिझनेस

Today Gold Rate: सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी सोन्याने उच्चांक गाठला, १० तोळ्यामागे ९,३०० रुपयांची वाढ; वाचा आजचे भाव

Today Gold Rate Hike 1st September: आज सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर वाढले आहे. प्रति तोळ्यामागे ९३० रुपयांनी वाढ झाली आहे.

Siddhi Hande

सोन्याच्या दरात वाढ

सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ९३० रुपयांनी महागले

१ तोळ्यासाठी मोजावे लागणार १ लाख ५ हजार रुपये

गणेशोत्सव सुरु आहे. काल अनेकांच्या घरोघरी गौरीचं आगमन झालं. गौरीपूजन केलं जातं.गौरीसाठी अनेकजण सोन्याचे काहीतरी दागिने करतात. सोनं खरेदी करतात. सणासुदीच्या दिवसात सोने खरेदी केलेले चांगले असते, असं म्हणतात. परंतु सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सध्या सोने खरेदी करावे की नाही असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. सोन्याचे दर आज प्रति तोळ्यामागे ९३० रुपयांनी वाढले आहेत.

सोनं महागलं (Gold Rate Hike)

आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १,०५,८८० रुपये झाले आहेत. या दरात ९३० रुपयांची वाढ झाली आहे. ८ ग्रॅममागे ७४४ रुपयांची वाढ होऊन हे दर ८४,७०४ रुपये झाले आहेत. १० तोळ्याच्या दरा ९,३०० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर १०,५८,८०० रुपये झाले आहेत.

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate)

आज २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ८५० रुपयांनी वाढले आहेत. हे दर ९७,०५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याच्या दरात ६८० रुपयांची वाढ होऊन हे दर ७७,६४० रुपये झाले आहेत.१० तोळा सोन्याचे दर ९,७०,५०० रुपये झाले आहेत.

१८ कॅरेट सोन्याचे भाव (18k Gold Rate)

आज १८ कॅरेट सोन्याच्या दरात ७०० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर ७९,४१० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याच्या दरात ५६० रुपयांची वाढ होऊन हे दर ६३,५२८ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे ७००० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर ७,९४,१०० रुपये झाले आहेत.

गणेशोत्सवात अनेकजण सोने खरेदी करतात. ज्येष्ठ गोरी पुजेनिमित्तदेखील गौराईला सोनं घालतात. परंतु सध्या सोन्याचे दर एवढे वाढले आहेत की सोनं खरेदी करावं की नाही असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. सोन्याचे दर १ लाख ५ हजारांपेक्षा जास्त झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT