Today Gold Rate Saam Tv
बिझनेस

Today Gold Rate: महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर ११४०० रुपयांनी वाढले; १० तोळ्यासाठी किती पैसे मोजावे लागणार?

Today Gold Price Increase: सोन्याच्या दरात आज वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात सोन्याचे दर कमी झाले होते. त्यानंतर आज या दरात ११४० रुपयांनी वाढ झाली आहे.

Siddhi Hande

गेल्या आठवड्यात सोन्याचे दर घसरले होते. त्यानंतर कालदेखील सोन्याचे भाव कमी झाले होते. दरम्यान, आज जूनच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर वाढले आहे. सोन्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र फटका बसणार आहे. सोन्याचे दर आज प्रति तोळा १,१४० रुपयांनी वाढले आहेत.

सोन्याच्या दरात वाढ (Gold Rate Hike)

आज सोन्याने पुन्हा भाव काढला आहे. मागच्या आठवड्यात थोडासा दिलासा मिळाला होता. त्यानंतर आज पुन्हा भाव वाढल्याने ग्राहकांना मात्र ,सोने खरेदी करावेत की नाही असा प्रश्न पडला आहे.

आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात ११४० रुपयांनी वाढ झाली आहे. आज सोन्याचे दर ९८,४०० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोनं ७८,७२० रुपयांवर विकले जात आहे. तर १० तोळा सोन्याचे दर ११,४०० रुपयांनी वाढले आहेत. १० तोळ्याचे दर ९,८४,००० रुपये आहे.

आज २२ कॅरेट (22k Gold Rate) सोन्याच्याही दरात वाढ झाली आहे. १०५० रुपये प्रति तोळा वाढ झाली आहे. हे दर ९०,२०० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७२,१६० रुपये आहेत. १० तोळा सोन्याचे दर ९,०२,००० रुपये आहे. याचे दर ९,०२,००० रुपये आहेत. आज १८ कॅरेट सोन्याच्या दरात ८६० रुपयांनी वाढ झाली आहे. १० ग्रॅम सोन्याची किंमत ७३,८०० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ५९,०४० रुपये आहे.

चांदीचे दर वाढले (Silver Rate Hike)

आज चांदीच्या दरातदेखील वाढ झाली आहे. आज १० ग्रॅम चांदीचे दर ११०० रुपये आहेत. १०० ग्रॅम चांदीचे दर ११,००० रुपये आहेत. या दरात २३०० रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्यासोबत चांदीचेही दर वाढले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: हनी ट्रॅपचा मुद्दा गाजत असतानाच खडसेंनी पत्रकार परिषदेतच महाजनांचा तो व्हिडिओ लावला | VIDEO

Congress Leader Dies : काँग्रेस नेत्याचा भीषण अपघातात जागीच मृत्यू; राजकीय वर्तुळात हळहळ

Atal Setu : आतापर्यंत १ कोटी ३० लाख वाहनांचा प्रवास, 'अटल सेतू'मुळे सरकारच्या तिजोरीत कोट्यवधींची भर

Digestion Tips: पचनक्रिया मजबूत ठेवण्यासाठी झोपण्यापूर्वी नक्की करा 'हे' उपाय

Bhagavad Gita: भगवद्गीतेचा सहावा अध्याय कोणती शिकवण देतो?

SCROLL FOR NEXT