Gold- Silver Price Drop Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: नवरात्रीत सोन्याच्या दरात मोठी घसरण, 10 तोळा सोनं 3,900 रुपयांनी स्वस्त; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

Gold- Silver Price Drop: सोनं-चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेटचे १० तोळा सोनं ३,९०० रुपयांनी स्वस्त झालं आहे.

Priya More
  • सोनं-चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाली

  • नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी सोनं-चांदी खरेदी करण्याची चांगली संधी

  • आजचा १८, २२ आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव घसरला

  • १० तोळे सोन्याच्या दरात ३९०० रुपयांची घसरण

  • १ किलो चांदी ५००० रुपयांनी स्वस्त झाली

नवरात्रीमध्ये सोनं खरेदीची सुवर्णसंधी आहे. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाली. आज सराफा बाजार उघडताच सोनं-चांदी स्वस्त झाली त्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ३,९०० रुपयांनी घसरण झाली. तर चांदी देखील स्वस्त झाली आहे. १ किलो चांदी ५००० रुपयांनी स्वस्त झाली आहे. आज तुम्ही सोनं-चांदी खरेदी करायला जाणार असाल तर १८-२२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर किती आहेत ते पाहून जा...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, २४, २२ आणि १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात आज मोठा बदल झाला. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ३९० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना १,४९,२९० रुपये खर्च करावे लागतील. २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ३,९०० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना १४,९२,९०० रुपये खर्च करावे लागतील.

आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये देखील मोठी घसरण झाली आहे. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ३५० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,३६,८५० रुपये खर्च करावे लागतील. २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ३५०० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना १३,६८,५०० रुपये द्यावे लागतील. सोन्याचे दागिने साधारणता २२ कॅरेटचे बनवले जातात. त्यामुळे आज तुम्हाला २२ कॅरेटच्या सोन्याचे दागिने खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे.

२४ आणि २२ कॅरेट सोन्यापाठोपाठ १८ कॅरेटचे सोनं देखील स्वस्त झालं आहे. १८ कॅरेटचे १ तोळा सोनं २९० रुपयांनी स्वस्त झालं. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,११,९७० रुपये खर्च करावे लागतील. १८ कॅरेटचे १० तोळा सोनं २९०० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना ११,१९,७०० रुपये खर्च करावे लागतील.

सोन्यासोबत आज चांदी देखील स्वस्त झाली आहे. आज १ ग्रॅम चांदी ५ रुपयांनी स्वस्त झाली. १ ग्रॅम चांदी २३५ रुपयांनी विकली जात आहे. तर आज १ किलो चांदीच्या दरामध्ये ५००० रुपयांची घसरण झाली आहे. ही चांदी खरेदीसाठी ग्राहकांना २,३५,००० रुपये खर्च करावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kuttu Flour Puri Recipe : उपवासाची कुट्टूची पुरी बनवताना तुटते? पिठात मिसळा 'हा' पदार्थ, पुरी होईल कुरकुरीत अन् टम्म फुललेली

Chilled Water: थंड पाणी पिणे फायदेशीर की हानिकारक? जाणून घ्या शरीरावर होणारे ७ परिणाम!

Maharashtra News Live Update : जंतर-मंतरवर खळबळ! CJPचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका पोलिसांच्या ताब्यात

Papaya Leaf Juice Benefits for Platelets: रक्तातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी प्या पपईच्या पानांचा रस; जाणून घ्या योग्य पद्धत

ट्रॅफिकची झंझट कायमची मिटणार! मरीन ड्राईव्ह ते ऑरेंज गेट फक्त ५ मिनिटांत; मुंबईकरांसाठी मोठी बातमी

SCROLL FOR NEXT