आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोनं-चांदी झाली स्वस्त
गणेशोत्सवात सोनं-चांदी खरेदीची सुवर्णसंधी
२४ कॅरेटचे १ तोळा सोनं १,५५,६८० रुपये झाले
१ किलो चांदीमध्ये ५००० रुपयांची घसरण
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सवाच्या काळात ग्राहकांना सोनं खरेदीची सुवर्णसंधी आहे. कारण पुन्हा सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १६० रुपयांची घसरण झाली. तर आज १ किलो चांदी ५००० रुपयांनी स्वस्त झाली आहे. आज सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी जर तुम्ही जाणार असाल तर आजचे १८-२२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर किती आहेत ते जाणून घ्या...
गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. २४ कॅरेटचे १ तोळा सोनं १६० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,५५,६८० रुपये खर्च करावे लागतील. २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १,६०० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना १५,५६,८०० रुपये खर्च करावे लागतील.
२२ कॅरेट सोन्याच्या दरात देखील आज मोठी घसरण झाली. २२ कॅरेटचे १ तोळा सोनं १५० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,४२,७०० रुपये खर्च करावे लागतील. २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १,५०० रुपयांनी घसरण झाली. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना १४,२७,००० रुपये खर्च करावे लागतील. सोन्याचे दागिने २२ कॅरेटचे बनवले जातात. २२ कॅरेटच्या सोन्याचे दर घसरल्यामुळे आज तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करु शकता.
२४ आणि २२ कॅरेटपाठोपाठ १८ कॅरेट सोन्याच्या दरात देखील आज मोठी घसरण झाली. १८ कॅरेटचे १ तोळा सोनं१२० रुपयांनी स्वस्त झालं. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,१६,७६० रुपये खर्च करावे लागतील. २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १,२०० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना ११,६७,६०० रुपये खर्च करावे लागतील.
दरम्यान, आज सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. आज १ ग्रॅम चांदीच्या दरामध्ये ५ रुपायांनी घसरण झाली. ही चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांना २५० रुपये खर्च करावे लागतील. तर १ किलो चांदीच्या दरामध्ये तब्बल ५००० रुपयांची घसरण झाली आहे. ही चांदी खरेदीसाठी ग्राहकांना २,५०,००० रुपये मोजावे लागतील. आज तुम्ही सोन्यासोबत चांदी देखील खरेदी करू शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.