Gold Silver Price Today Saam Tv
बिझनेस

Gold Rate : लक्ष्मीपूजनाला सोन्याची दिवाळी, तब्बल 3 हजार 300 रुपयांनी महागलं, वाचा आजचे दर

Gold Silver Price Today : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोन्याचे दर तब्बल ₹३,३०० ने वाढले असून जळगावमधील २४ कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह ₹१,३४,४१५ प्रति तोळ्यांवर पोहोचला आहे. दरवाढ असूनही सराफ बाजारात खरेदीदारांची मोठी गर्दी दिसली.

Namdeo Kumbhar

संजय महाजन, जळगाव प्रतिनिधी

Gold Rate Today In India : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोन्याचे दराने उच्चांक गाठले आहेत. जळगावमधील सुवर्णनगरीत सोन्याने नवा विक्रम प्रस्तापित केला आहे. २४ कॅरेटचे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति तोळा एक लाख ३४ हजार ४१५ रूपयांवर (24 carat gold rate crosses 1 lakh 34 thousand per tola) पोहोचले आहेत. तर दुसरीकडे दोन दिवसांपासून स्थिर असणाऱ्या चांदीच्या दरात किरकोळ घट पाहायला मिळाली. चांदीचे दर १०० रूपयांनी घसरले आहेत. (Gold price today Laxmi Pujan 2025 Jalgaon market )

जळगावच्या सराफ बाजारात लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सोन्याच्या खरेदीला झुंबड उडाली आहे. सोन्याचे दर वाढले आहेत, पण तरीही खरेदीदाराचा उत्साह मात्र कायम आहे. मागील १२ तासात सोन्याच्या दरामध्ये ३ हजार ३०० रुपयांची वाढ (Gold prices rise by 3300 rupees on Diwali day India) झाली आहे. तर दुसरीकडे चांदीचे दर मात्र स्थिर असल्याचा पाहायलं मिळत आहे. सुवर्णनगरीत सोन्याचे दर जीएसटीसह एक लाख ३४ हजार ४१५ रूपयांवर पोहोचले आहेत.

लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त असल्याने मुहूर्तावर सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची सराफ दुकानांमध्ये गर्दी होत असल्याचे चित्र जळगावसह राज्यात पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत मोठी भाव वाढ झाल्यामुळे बजेट कोलमडले असल्याच्या प्रतिक्रिया ग्राहकांनी यावेळी व्यक्त केल्या.आज दुपारून सोन्याच्या दरात आणखीन वाढ होऊ शकते असा अंदाज सराफ व्यवसाय यांनी व्यक्त केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दराने नवे उच्चांक गाठले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत सोन्याचे दर ५० हजारांनी वाढल्याचे चित्र आहे. दसरा, दिवळीत सोन्याच्या खरेदीकडे लोकांचा कल जास्त असतो. त्यात आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्यामधील गुंतवणूकही वाढली आहे. सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजार अस्थिर झाल्यानंतर सोन्याचे दरात वाढ होते. गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याचे दर वाढतच चालले आहे. जळगावमधील सराफा व्यावसायिकांच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South africa : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; ऋषभ पंतकडे कर्णधारपदाची जबाबदारी

Maharashtra Live News Update : लातूरमध्ये हॉटेल व्यवसायकावर धारदार शस्त्राने हल्ला

Vashi Fire: नवी मुंबईत मोठ्या इमारतीत भीषण आग; चिमुकलीसह चौघांचा मृत्यू, घटनेमागे वेगळंच कारण समोर

Dia Mirza: दिवाळी स्पेशल अभिनेत्री दीया मिर्झाचा शाही लूक, पाहा PHOTO

Pakistan Attack News : पाकिस्तानवर भीषण हल्ला; बलूचिस्तान-तालिबान्यांच्या हल्ल्यात १० सैनिकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT