Gold Rate Today Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today : धनत्रयोदशीआधी सोन्याची दिवाळी, एक तोळा सोन्याची किंमत १.२८ लाख

gold rate increase before dhanteras : सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. सराफा बाजारात सोन्याची किंमत १.२८ लाखांवर पोहोचली असून चांदीनेही दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता.

Namdeo Kumbhar

Gold Price Surges Before Dhanteras; Experts Predict ₹1.5 Lakh per Tola Soon : मागील काही आठवड्यात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली. त्यामुळे दिवाळीत सोन्याची किंमत आवाक्यात येण्याची गुंतवणूक दारांची आशा धुळीस मिळाली. आज सराफा बाजार उघडल्यानंतर सोनं अन् चांदीच्या दराने नवा विक्रम प्रस्थापित केला. दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या आधी सोन्याची किंमत एक लाख २८ हजारांवर पोहचली आहे. पुढील काही दिवस सोने आणि चांदीच्या किमतीतील वाढ थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. देशांतर्गत मागणी, डॉलरची कमकुवतता आणि सकारात्मक जागतिक संकेत याच्यात गुरुवारी सोने आणि चांदीच्या किमती नवीन विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत.

अमेरिकन फेडकडून पुन्हा एकदा दर कपात होण्याची शक्यता आहे. अमेरिका-चीन व्यापार तणाव आणि इतर भू-राजकीय तणाव यामुळे सोन्याच्या दरात वाढ झालेली आहे. यापुढेही काही दिवस सोन्याच्या दरात वाढ कायम राहण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात सोन्याची किंमत दीड लाखाच्या घरात गेल्यास वावगं वाटायला नको. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे, पण पुरवठा कमी आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ होत आहे.

दुसरीकडे सोन्यापेक्षा चांदीच्या दरात अतिशय वेगाने वाढ होत आहे. चांदीची किंमत प्रति किलो दोन लाखांच्या पुढे गेल्याचे सराफा बाजारात दिसून आले. मागील काही दिवसांत सोन्यापेक्षा विक्रमी वेगाने चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. चांदीची मागणी वाढल्यामुळे दरात वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) चा सोनं अन् चांदीच्या दरात वाढ झाल्याचे समजतेय. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास एमसीएक्सवर सोन्याचा भाव ०.६२ टक्क्यांनी वाढला. म्हणजे, सोन्याचा दर ७८५ रुपयांनी वाढून १,२७,९९५ रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे. दुसरीकडे चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. जीएसटीसह चांदीचा दर दोन लाखांपर्यंत पोहचल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, गुड रिटर्नस संकेतस्थळानुसार, सोन्याच्या किंमतीमध्ये सध्या कोणताही वाढ अथवा कपात झालेली दिसत नाही. सोन्याच्या किमती जैसे थे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT