24k, 22K ,18K gold rate in mumbai pune nashik Saam TV MArathi
बिझनेस

Gold Rate Today : पाडव्याला मुंबई-पुण्यात सोनं झालं स्वस्त, प्रति तोळा २७८० रूपयांची घसरण, वाचा 22k,24k गोल्डचे ताजे दर

24K Gold Rate : गुढीपाडव्याआधी सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली असून २४ कॅरेट सोनं प्रति तोळा ₹२७८० ने स्वस्त झालं आहे. मुंबई, पुणे, दिल्लीसह प्रमुख शहरांतील २२K, २४K आणि १८K सोन्याचे ताजे दर जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

Gold Rate Today 19 March 2026 : गुढी पाडव्याच्या आनंदात आणखी एक खुशखबर लोकांना मिळाली आहे. मराठी नववर्षाची सुरूवातीलाच सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. आज सराफा बाजार उघडताच २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा २७८० रूपयांची घसरण नोंदवण्यात आली. महाराष्ट्रात पाडव्याला अनेकजण सोन्याची खरेदी करतात, त्या सर्वांना हा आनंदाचा धक्का मानला जातोय. सोन्यासोबतच चांदीच्या दरातही मोठा बदल झाला आहे. आखाती देशात युद्धाचा वणवा पेटला असतानाच सोन्याचे दर घसरले आहेत. मुंबई, पुणे, जळगावपासून दिल्ली आणि चेन्नईमध्ये सोन्याच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. भारतीय बाजारात सोन्याचे दर किती आहेत, याबाबत जाणून घेऊयात. (24K Gold Drops ₹2780 Per Tola Ahead of Gudi Padwa)

२४-कॅरेट सोन्याच्या किंमतीमध्ये बुधवारच्या तुलनेत मोठी घसरण पाहायला मिळाली. सोन्याचे दर आज १५७,५७० प्रति १० ग्रॅमवरून घसरून ₹१,५४,७९० वर आले आहेत. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव आज प्रति तोळा ₹१४१,९०० इतका आहे. बुधवारी हेच सोनं ₹१४४,४५० इतकं होतं. १८-कॅरेट सोन्याचा भावही घसरला आहे. आज सराफा बाजारात १८-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ₹११६,१३० आहे, जो बुधवारी ₹११८,२२० इतका होता.

प्रमुख शहरात सोन्याचा दर काय ?

मुंबई, पुणे

२४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा ₹१,५४,६४०

२२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ₹१,४१,७५० आहे.

दिल्ली

२४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा ₹१,५४,७९०

२२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ₹१,४१,९०० आहे.

कोलकाता

२४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ₹१,५४,६४०

२२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति प्रति तोळा ₹१,४१,७५० आहे.

जयपूर

२४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा ₹१,५४,७९०

२२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ₹१,४१,९०० आहे.

लखनौ

२४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा ₹१,५४,७९०

२२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ₹१,४१,९०० आहे.

तेलाच्या किमती वाढल्यानंतर महागाईचा धोकाही वाढतो. सोने आणि चांदी सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. त्यामुळे गुंतवणूक त्यात मोठ्या प्रमाणात वाढते. पण सराफा बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमती घसरत आहेत. अमेरिकेच्या धोरणांकडेच फक्त आंतरराष्ट्रीय बाजाराचे लक्ष नाही, तर आखाती देशातील तणावाकडेही गुंतवणूकदाराचे बारकाईने लक्ष आहे. अमेरिका-इस्त्राईल आणि इणराण यांच्यातील बिघडत चाललेली परिस्थिती आणि कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. पण याचा सोन्याच्या मार्केटवर गंभीर परिणाम पडलेला दिसत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara : गर्भपातानंतर बाळ जिवंत जन्मलं, १२ तास उपाशी ठेवल्यानं मृत्यूचा आरोप; मातेसह कुटुंबीयांची हायकोर्टात याचिका

Maharashtra Live News Update: प्रोटोकॉल मुद्द्यावर उपमहापौर संजय घाडी नाराज; पदाचा सन्मान राखण्याची प्रशासनाला करून दिली आठवण

Tumbbadchi Manjula: हे डोळे कुणाचे..? गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'तुंबाडची मंजुळा'

Amravati Summer Tourism: अमरावतीजवळची 'ही' सुंदर 8 ठिकाणे फिरण्यासाठी ठरतील बेस्ट, निसर्गसौंदर्य पाहून मन होईल प्रसन्न

Ankita Walawalkar: गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अंकिता वालावलकरने चाहत्यांना दिली गुड न्यूज; नवऱ्यासोबत शेअर केला खास फोटो

SCROLL FOR NEXT