gold rate today October 12 2026 in Maharashtra Mumbai Pune : नवरात्रीच्या पवित्र सणाला सुरूवात होत असतानाच सोन्याची खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. आज आठवड्याच्या सुरुवातीलाच सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा (१० ग्राम) ४४० रुपयांनी स्वस्त झाले आहेत. २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरातही घट पाहायला मिळाली आहे.
आगामी दिवसांत नवरात्र, दसरा, दिवाळी यांसारखे मोठे सण-उत्सव आणि त्यानंतर सुरू होणारा लग्नसराईचा हंगाम पाहता सोन्याच्या मागणीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा स्थितीत सणासुदीच्या तोंडावर झालेली ही दरघसरण खरेदीदारांच्या पथ्यावर पडणार आहे. २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा (१० ग्राम) ४४० रुपयांनी स्वस्त झाले आहेत. त्याची किंमत आता १,५०,९८० रुपयांवर पोहोचली आहे. तर १ ग्रामचा दर १५,०९८ रुपये झाला आहे.
२२ कॅरेट सोन्याच्या दरातही मोठी घट पाहायला मिळाली आहे. २२ कॅरेट सोने प्रति तोळा ४०० रुपयांनी स्वस्त होऊन १,३८,४०० रुपयांवर आले आहे. तर प्रति ग्राम दर ४० रुपयांनी घटून १३,८४० रुपये नोंदवला गेला आहे. दुसरीकडे १८ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा ३३० रुपयांची घसरण झाली. त्याचा १० ग्रामचा दर १,१३,२४० रुपये झाला आहे. सणांच्या तोंडावरच सोन्याचे भाव उतरल्यामुळे बाजारात खरेदीचा उत्साह वाढण्याची चिन्हे आहेत.
तुमच्या शहरातील सोन्याचे दर काय? (प्रति ग्रॅम)
मुंबई (Mumbai):
२४ कॅरेट : ₹ १५,१४१
२२ कॅरेट : ₹ १३,८७९
१८ कॅरेट : ₹ ११,३५६
पुणे (Pune):
२४ कॅरेट : ₹ १५,१४१
२२ कॅरेट : ₹ १३,८७९
१८ कॅरेट : ₹ ११,३५६
जळगाव (Jalgaon):
२४ कॅरेट : ₹ १५,०९८
२२ कॅरेट : ₹ १३,८४०
१८ कॅरेट : ₹ ११,३२४
ठाणे (Thane):
२४ कॅरेट : ₹ १५,०९८
२२ कॅरेट : ₹ १३,८४०
१८ कॅरेट : ₹ ११,३२४
अमरावती (Amravati):
२४ कॅरेट : ₹ १५,०९८
२२ कॅरेट: ₹ १३,८४०
१८ कॅरेट : ₹ ११,३२४
वसई-विरार (Vasai-Virar):
२४ कॅरेट: ₹ १५,१०१
२२ कॅरेट: ₹ १३,८४३
१८ कॅरेट: ₹ ११,३२७
छत्रपती संभाजीनगर:
२४ कॅरेट: ₹ १५,०९८
२२ कॅरेट: ₹ १३,८४०
१८ कॅरेट: ₹ ११,३२४
सोलापूर (Solapur):
२४ कॅरेट: ₹ १५,०९८
२२ कॅरेट: ₹ १३,८४०
१८ कॅरेट: ₹ ११,३२४
भिवंडी (Bhiwandi):
२४ कॅरेट: ₹ १५,१०१
२२ कॅरेट: ₹ १३,८४३
१८ कॅरेट: ₹ ११,३२७
कोल्हापूर (Kolhapur):
२४ कॅरेट: ₹ १५,०९८
२२ कॅरेट: ₹ १३,८४०
१८ कॅरेट: ₹ ११,३२४
आगामी दिवसांत नवरात्र, दसरा, दिवाळी यांसारखे मोठे सण-उत्सव आणि त्यानंतर सुरू होणारा लग्नसराईचा हंगाम पाहता सोन्याच्या मागणीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नवरात्रीच्या सुरुवातीलाच झालेली ही घसरण ग्राहकांना दिलासा देणारी ठरली असून, बाजारात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.