gold price history saam tv
बिझनेस

Dhanteras Gold Price : २०१५ मध्ये २५ हजार तोळा, यंदा किती किंमत! वाचा १० वर्षांत सोन्याच्या किमतीत किती वाढ झाली?

Gold Price Hike : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर मुंबईच्या सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी झाली आहे. गेल्या १० वर्षांत सोन्याचे दर किती वाढले याचा आकडा समोर आला आहे.

Sakshi Sunil Jadhav

दिवाळी सणाला सुरूवात झाली असून धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर मुंबईतल्या सराफा बाजारात खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. धनत्रयोदशीला सोनं, चांदी आणि नवीन वस्तू खरेगी करणं शुभ मानलं जातं. त्यामुळे सकाळपासूनच सोन्या-चांदीच्या दुकानांमध्ये ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. अनेक जण सोन्याचे दागिने, चांदीची नाणी तसेच लक्ष्मी-गणेशाच्या मूर्ती खरेदी करण्याला पसंती देत आहेत. मात्र, गेल्या काही वर्षात सोन्याच्या दरात झालेली वाढ पाहता यंदा सोनं खरेदी करताना ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत.

१० वर्षांत सोन्याच्या दरात किती वाढ?

गेल्या दहा वर्षांतल्या सोन्याच्या दरांवर नजर टाकल्यास मोठी वाढ झाल्याचं दिसून येतं. २०१५ मध्ये १० ग्रॅम सोन्याचा दर २५ हजार ६४८ रुपये होता. २०२० मध्ये हाच दर ५१ हजार ४३ रुपये झाला. त्यानंतर सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत गेली. २०२३ मध्ये सोन्याचा दर ६० हजार ७४६ रुपयांवर पोहोचला, तर २०२४ मध्ये तो ७९ हजार १४३ रुपये झाला. २०२५ मध्ये सोन्याचा दर तब्बल १ लाख २१ हजार १६४ रुपये प्रति १० ग्रॅम नोंदवण्यात आला.

दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२०२५ – एक लाख एकवीस हजार एकशे चौसष्ट रुपये

२०२४ – एकोणऐंशी हजार एकशे त्रेचाळीस रुपये

२०२३ – साठ हजार सातशे सेहचाळीस रुपये

२०२२ – पन्नास हजार सहाशे पंचवीस रुपये

२०२१ – सत्तेचाळीस हजार सहाशे चौऱ्याहत्तर रुपये

२०२० – एकावन्न हजार त्रेचाळीस रुपये

२०१९ – अडतीस हजार दोनशे त्र्याहत्तर रुपये

२०१७ – एकोणतीस हजार सहाशे पस्तीस रुपये

२०१६ – एकोणतीस हजार नऊशे बत्तीस रुपये

२०१५ – पंचवीस हजार सहाशे अठ्ठेचाळीस रुपये

सोन्याच्या दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री

एकीकडे धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याचा उत्साह दिसत आहे, तर दुसरीकडे वाढत्या किमतींमुळे ग्राहक बजेटनुसार खरेदी करत आहेत. काही ग्राहक सोन्याच्या दागिन्यांऐवजी सोन्याची नाणी किंवा चांदीच्या वस्तू खरेदी करण्याला प्राधान्य देत आहेत. एकूणच, धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर मुंबईतला सराफा बाजारात खरेदीचा उत्साह पाहायला मिळत असून, गेल्या दहा वर्षांतल्या सोन्याचा दरवाढीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

आजचा सोन्याचा भाव

आज, ६ नोव्हेंबर २०२६ रोजी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर मुंबईत सोन्याचे दर जवळपास स्थिर आहेत. मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा भाव १,४६,०३० रुपये प्रति १० ग्रॅम, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १,३३,८६० रुपये आहे. १८ कॅरेट सोन्याचा भाव १,०९,५३० रुपये प्रति १० ग्रॅम नोंदवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: सतत हात-पाय थंड पडतात? शरीरातील 'या' ७ समस्या असू शकतात कारणीभूत!

Maharashtra News Live Update: राज ठाकरे यांचा शरद पवारांना फोन; प्रकृतीची केली विचारपूस

Kitchen Vastu Tips: गॅस आणि सिंक एकाच ओट्यावर असणं अशुभ? वाचा वास्तुशास्त्राचा नियम काय सांगतो, उपायही जाणून घ्या

Sharad Pawar : प्रफुल पटेलांनी रुग्णालयात घेतली शरद पवारांची भेट; नेमकी काय चर्चा झाली?

Gold Rate: धनत्रयोदशीला सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, सोनं ३५०० तर चांदी ९ हजारांनी घसरली; सुवर्णनगरीत गर्दीचा महापूर

SCROLL FOR NEXT