Gold Rate Saam Tv
बिझनेस

Gold Rate: १० वर्षात १ लाखानं वाढलं सोनं, २०१५ मध्ये किती रूपये तोळा होतं गोल्ड? वाचा १०० वर्षाचा इतिहास

Gold Rate Analysis For 100 Years: मागील १०० वर्षात सोन्याचे दर जवळपास सव्वा लाखांनी वाढले आहेत. यातील सर्वाधित दर हे मागील १० वर्षात झाले आहे. दहा वर्षात हे दर १ लाखांनी वाढले आहेत.

Siddhi Hande

सोन्याच्या दरात सर्वाधिक वाढ

सोन्याचे दर मागील दहा वर्षात १ लाखाने वाढले

मागील १०० वर्षाचे दर वाचा

दिवाळीत सोन्याचे दर सातत्याने वाढताना दिसत आहे. सोन्याच्या दर सध्या १ लाख ३० हजारांवर गेले आहे. मागील १० वर्षांत सोन्याचे दर सव्वा लाख रुपयांनी वाढले आहेत. आज १ तोळा सोन्याच्या दरात १ किलो सोने खरेदी करता येत होतं. १९८० मध्ये तुम्ही किलोभर सोने खरेदी करु शकत होता. ४५ वर्षांपूर्वी सोन्याचे दर फक्त १३०० रुपये आहे.

१९२५ मध्ये सोन्याचे दर १८ रुपये ७५ रुपये प्रति तोळा होते. सोन्याने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. सध्या सोन्याचे दर १ लाख ३० हजार रुपये झाले आहेत. जागतिक बाजारपेठेतील बदल आणि गुंतवणूक यामुळे सोन्याचे दर वाढले आहेत. यापुढेदेखील सोन्याचे दर वाढणार असल्याचे सराफा व्यापारी सांगतात.

१० वर्षात १ लाखांची वाढ (Gold Rate Hike in Last 10 Year)

१०० वर्षांपूर्वी म्हणजे १९२५ मध्ये सोन्याचे दर १९ रुपये ७५ पैसे होते. हेच दर २०२५ मध्ये १ तोळा २९ हजारांवर पोहचले आहे. मागील दहा वर्षात म्हणजे २०१५ ते २०२५ या काळात सोन्याचे दर सर्वाधिक वाढले आहेत. २०१५ मध्ये सोन्याचे द प्रति तोळा २६००० रुपये होते. हे दर आज १ लाखांपेक्षा जास्त वाढले आहेत.

१ हजारावर पोहचण्यासाठी ५५ वर्षे

१९२५ मध्ये सोन्याचे दर १८ रुपये ७५ पैसे होते. हा दर १ हजार रुपये होण्यासाठी ५५ वर्षे गेली. त्यानंतर २७ वर्षांनी म्हणजे २००७ मध्ये हे दर १० हजार रुपये झाले. यानंतर २०१५ मध्ये २६००० आणि २०२५ मध्ये १ लाख ३० हजार रुपये झाले आहेत.

आतापर्यंतचे सोन्याचे दर (Gold Rate Till Today)

१९२५ मध्ये सोन्याचे दर १९.७५ रुपये होते. १९३५ मध्ये हे दर ३०.८१ रुपये होते. १९४५ मध्ये ६२ रुपये होते. १९५५ मध्ये ७९.१८ रुपये होते. १९६५ मध्ये ७१. ७५ रुपये झाले होते. १९८५ मध्ये हे दर २१३० झाले होते. १९९५ मध्ये हे दर ४६८० होते. २००५ मध्ये ७००० रुपये झाले आहेत. २०१५ मध्ये २६ हजार ३०० रुपये झाले होते. त्यानंतर २०२५ मध्ये हे दर १ लाख ३० हजार रुपये झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मातोश्रीत भाजपच्या माजी नगरसेवकासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश; नरकासुराचा वध करण्यासाठी आला-उद्धव ठाकरे|VIDEO

Maharashtra Live News Update : सुमारे 11 हजार दिव्यांची रोषणाई करत प्रकाशा येथे संगमेश्वर महाआरती...हजारो भाविकांची उपस्थिती.

Lakshmi Pujan 2025: लक्ष्मीपूजनाला सोने-चांदीऐवजी या ४ वस्तू घरी आणा; वर्षभर पैशांची कमी जाणवणार नाही

Boss Gifts Car: बॉस नाही भगवान! कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्टमध्ये दिल्या महागड्या कार; VIDEO व्हायरल

Swabhimani Shetkari Sanghatna : दिवाळी सणात चटणी भाकर आंदोलन; शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT