Gold Price Hike Saam Tv
बिझनेस

Gold Rate Hike: खरेदीदारांच्या खिशाला फटका! सोन्याच्या दरात मोठी वाढ; आजचे दर वाचा

Gold Rate Hike Today: आज सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. आज सोन्याच्या किंमतीत प्रति तोळा ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याने खरेदीदारांच्या खिशाला फटका बसणार आहे.

Siddhi Hande

सध्या सणासुदीचे आणि लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे सोने खरेदीसाठी अनेक ग्राहकांची गर्दी होताना दिसत आहे. मात्र, दिवसेंदिवस सोन्याच्या किंमती वाढत आहेत त्यामुळे सोने खरेदी करावे की नाही असा प्रश्न खरेदीदारांसमोर निर्माण झाला आहे. सोन्याच्या रोज नवीन किंमती अपडेट होत असतात. सोन्याच्या किंमती आज वाढल्या आहेत. जाणून घ्या आजचे सोने चांदीचे दर

सोन्याचे दर

आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात ५०० रुपये प्रति तोळा वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोने आज प्रतितोळा ९९,००० रुपयांवर विकले जात आहे. जीएसटी लागू केल्यावर हा दर १ लाखांपेक्षा जास्त होणार आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ७९,२०० रुपये आहे. आज २२ कॅरेट सोने प्रति तोळा ९०,७५० रुपयांवर विकले जात आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७२,६०० रुपये आहे. सोन्याच्या दरात ५०० रुपयांनी वाढ झाली आहे.

१८ कॅरेट सोन्याच्या किंमतीत ४१० रुपयांनी वाढ झाली आहे. आज १८ कॅरेट सोने प्रति तोळा ७४,२५० रुपये झाले आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ५९,४०० रुपये आहे. सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे. सोन्याचे भाव १ लाखांपेक्षा जास्त झाले होते. पुन्हा एकदा सोन्याचे भाव वाढत आहेत.

चांदीचे दर

आज चांदीच्या दरात फार काही वाढ झालेली नाही. आज ८ ग्रॅम चांदी ७९२ रुपयांवर विकली जात आहे. १० ग्रॅम चांदीची किंमत ९९० रुपये आहे. तर १०० ग्रॅम चांदीची किंमत ९,९०० रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Couple Engagement : लोकप्रिय सिंगर ३५ व्या वर्षी अडकणार लग्न बंधनात; साखरपुड्याचे सुंदर फोटो शेअर, होणारा नवरा कोण?

Manoj Jarange Patil: आरपारची शेवटची लढाई, आता थांबायचे नाही; मनोज जरांगे मुंबईकडे रवाना

Kumbha Rashi : गणेश कृपेने कुंभ राशीचे भाग्य खुलणार, नोकरीत पदोन्नतीची शक्यता

'मुंबईत मला गोळ्या घाला, मी बलीदान द्यायला तयार'; मनोज जरांगे पाटलांचा फडणवीसांना इशारा

Maharashtra Live News Update: मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना

SCROLL FOR NEXT