Gold Rate Today Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: घसरणीनंतर सोनं महागलं, सोन्याच्या दरात २२०० रुपयांनी वाढ, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

Gold- Silver Price Today: सोनं-चांदीच्या दरात आज मोठी बदल झाला आहे. सराफा बाजार उघडताच आज सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली. तर चांदीचे दर काल ऐवढेच आहेत. आज सोनं खरेदी करायला जाण्यापूर्वी वाचा आजचे दर किती?

Priya More

Summary -

  • घसरणीनंतर सोन्याच्या दरात मोठी वाढ

  • २४ कॅरेट सोनं २,२०० रुपयांनी महाग झाले

  • २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरातही वाढ

  • चांदीच्या दरात कोणताही बदल नाही

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. घसरणीनंतर सोन्याच्या दरात मोठा बदल झाले आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सराफा बाजार उघडाच सोनं महाग झाले आहे. पण चांदीच्या दरात काहीच बदल झाला नाही. आज सोनं खरेदी करताना ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. २४ कॅरेटचे १० तोळा सोन्याच्या दरामध्ये २,२०० रुपयांनी वाढ झाली आहे. आज सोनं-चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी आजचे २४,२२ आणि १८ कॅरेटचे दर किती आहेत ते जाणून घ्या...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. २४ कॅरेटचे १ तोळा सोनं २२० रुपयांनी महाग झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,४६,८९० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये २,२०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १४,६८,९०० रुपये खर्च करावे लागणार आहे.

२२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील आज वाढ झाली आहे. २२ कॅरेटचे १ तोळा सोन्याचे दर २०० रुपयांनी वाढले आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,३४,६५० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २२ कॅरेटचे १० तोळा सोनं २,००० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १३,४६,५०० रुपये खर्च करावे लागतील.

२४ आणि २२ कॅरेट सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील चांगलीच वाढ झाली. आज १८ कॅरेटचे १ तोळा सोनं १६० रुपयांनी महाग झालं. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,१०,१७० रुपये खर्च करावे लागतील. तर १८ कॅरेटचे १० तोळा सोनं १,६०० रुपयांनी महाग झालं. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला आज तुम्हाला ११,०१,७०० रुपये खर्च करावे लागतील. आज २४,२२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरात वाढ झाल्यामुळे खरेदी करताना तुमच्या खिशावर ताण येणार आहे.

तुमच्या शहरातील सोन्याचे दर किती?

मुंबई -

२४ कॅरेट - १४,६८९ रुपये

२२ कॅरेट - १३,४६५ रुपये

१८ कॅरेट - ११,०१७ रुपये

पुणे -

२४ कॅरेट - १४,६८९ रुपये

२२ कॅरेट - १३,४६५ रुपये

१८ कॅरेट - ११,०१७ रुपये

चेन्नई -

२४ कॅरेट - १४,९१३ रुपये

२२ कॅरेट - १३,६७० रुपये

१८ कॅरेट - ११,४१० रुपये

दिल्ली -

२४ कॅरेट - १४,७०२ रुपये

२२ कॅरेट - १३,४८० रुपये

१८ कॅरेट - ११,०३२ रुपये

कोलकाता -

२४ कॅरेट - १४,६८९ रुपये

२२ कॅरेट - १३,४६५ रुपये

१८ कॅरेट - ११,०१७ रुपये

अहमदाबाद -

२४ कॅरेट - १४,६९४ रुपये

२२ कॅरेट - १३,४७० रुपये

१८ कॅरेट - ११,०२२ रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT