Gold Silver Price Hike  Saam TV
बिझनेस

Gold-Silver Price: सोन्याला पुन्हा झळाळी, अक्षय्य तृतीयेनंतर सर्वात मोठी वाढ, वाचा आजचे दर काय?

Gold Silver Price Hike Today: आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात २,७०० रुपयांची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदीचे दर घसरले आहेत. आजचे दर किती आहे वाचा सविस्तर...

Priya More

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. सोनं-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत होती. पण सोमवारपासून सोन्याच्या दरात पुन्हा वाढ व्हायला सुरूवात झाली. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात तब्बल २,७०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे पुन्हा सोन्याचे दर ९८ हजारांच्यावर गेले आहे. जीएसटीसह सोन्याचे दर पुन्हा एक लाखांपार गेले आहेत. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला पुन्हा कात्री लागली आहे.

गुडरिटर्न्स या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी भारतात २४ कॅरेट सोन्याचा दर २७५० रुपयांनी वाढला आहे. आता प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्यासाठी ९८,४६० रुपये मोजावे लागणार आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर २५०० रुपयांनी वाढला. त्यामुळे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्यासाठी ९०,२५० रुपये मोजावे लागणार आहे. तसंच, १८ कॅरेट सोन्याचा दरही आज २०४० रुपयांनी वाढला आहे. प्रति १० ग्रॅम १८ कॅरेट सोन्याचा दर ७३,८४० रुपये झाला आहे.

अशामध्ये १०० ग्रॅम म्हणजे १० तोळं सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला किती पैसे मोजावे लागू शकतात हे देखील जाणून घेणं महत्वाचं राहिल. भारतामध्ये १०० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव २५,००० रुपयांनी वाढून ९,०२,५०० रुपयांवर पोहोचला आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १०० ग्रॅम आता ९,८४,६०० रुपयांवर पोहोचला आहे जो २७,५०० रुपयांनी वाढला आहे.

एकीकडे सोन्याचे दर वाढले आहेत तर दुसरीकडे चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या १० दिवसांपासून भारतात चांदीच्या दरात घसरण होताना दिसत आहे. चांदीच्या दरात घसरण होऊन ते विक्रमी पातळीवरून जात आहेत. आज भारतात १ किलो चांदीची किंमत ९६,९०० रुपये आहे. चांदीचे दर १०० रुपयांनी कमी झाले आहेत. तर भारतात १०० ग्रॅम चांदीची किंमत १० रुपयांनी घसरली आहे. सध्या १०० ग्रॅम चांदी खरेदीसाठी ९,६९० रुपये मोजावे लागणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Crime : जालना हादरले; जुन्या वादातून तरुणाची हत्या, आई- वडिलांनाही बेदम मारहाण

Solar Eclipse: सूर्यग्रहणाच्या वेळी कोणत्या गोष्टी करु नये?

Sanjay Raut : राज-उद्धव ठाकरे एकत्र आल्याच्या धक्क्यातून फडणवीस सावरले नाहीत, संजय राऊतांचा टोला

Bhagavad Gita: भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायात कोणती शिकवण मिळते?

...तर बाळाला फेकून देईन अन् मीही आत्महत्या करेल, PCMC अधिकाऱ्याला महिलेची धमकी|VIDEO

SCROLL FOR NEXT