केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याआधीच सोन्याच्या दरात मोठा फेरफार पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दराने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजे MCX वर गुरुवारी वायदा बाजारात सोन्याचा भाव ८२००० रुपयांवर पोहोचला आहे. घरगुती मार्केटमध्ये रेकॉर्ड उच्च पातळीवर पोहोचला आहे. मागील वर्षी देखील अर्थसंकल्पात कस्टम ड्युटीमध्ये घट केल्यानंतर सोन्याच्या दरात पडझड पाहायला मिळाली होती. जळगावातही सोन्याचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत.
सोन्याच्या किंमतीत मागील आर्थिक वर्षात अर्थमंत्र्यांनी केलेल्या एका घोषणनंतर मोठी पडझड पाहायला मिळाली होती. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पातील सोन्यावरील कस्टम ड्युटीमध्ये घट करण्याची घोषणा केली होती. त्यांनी कस्टम ड्युटी १५ टक्क्यांहून ५ टक्के केली होती. सितारामन यांच्या घोषणेनंतर बजेटच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. तब्बल ४००० रुपयांनी १० ग्रॅम सोने स्वस्त झाले होते.
रिपोर्टनुसार, सोन्याचे दर कोसळल्यानंतर अर्थसंकल्पानंतर एका महिन्यातच दर वाढले होते. त्यामुळे यंदाही सरकारद्वारे सोन्यावरील कस्टम ड्युटीबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा अर्थसंकल्पातून दिलासा की झळ मिळणार, हे पाहावे लागेल.
एमसीएक्सवर सोन्याचे दर वाढलेले पाहायला मिळाले. ४ एप्रिल रोजी मुदत संपणाऱ्या सोन्याची किंमत ८२,४१५ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. मागील गुरुवारच्या दिवशी व्यवहार संपल्यानंतर १११४ रुपयांनी वाढून ८१,९८८ रुपयांवर बंद झाला. सोमवारी सोन्याचा दर ८०,१६० रुपये प्रति १० ग्रॅम होता. आता सोन्याचा दर २००० रुपये प्रति १० ग्रॅमहून अधिक झाला आहे.
एकीकडे संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना दुसरीकडे सुवर्णनगरी जळगावात सोन्याचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. अर्थसंकल्पात सोन्यावरील कर वाढले तर त्याचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
जळगावात सोन्याचे दर प्रतितोळा 84 हजार 600 रुपये (जीएसटीसह) इतके आहेत. तर चांदीचे दरही एक लाखांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत चांदीचे दर 95 हजार रुपये प्रतिकिलो होण्याची शक्यता आहे. अमेरिकेने घटवलेले व्याजदर, डॉलर मजबूत झाल्याचा परिणाम देखील सोने-चांदीच्या दरावर झाल्याचं बोललं जात आहे. अर्थसंकल्पात सोन्यावरील कर वाढले तर दर आणखी वाढणार असल्याची चर्चा आहे.
मुंबई
22 कॅरेट सोनं - 7,730 रुपये
24 कॅरेट सोनं - 8,433 रुपये
नाशिक
22 कॅरेट सोनं - 7,733 रुपये
24 कॅरेट सोनं - 8,436 रुपये
भिवंडी
22 कॅरेट सोनं - 7,733 रुपये
24 कॅरेट सोनं - 8,436 रुपये
पुणे
22 कॅरेट सोनं - 7,730 रुपये
24 कॅरेट सोनं - 8,433 रुपये
नागपूर
22 कॅरेट सोनं - 7,730 रुपये
24 कॅरेट सोनं - 8,433 रुपये
अमरावती
22 कॅरेट सोनं - 7,730 रुपये
24 कॅरेट सोनं - 8,433 रुपये
सोलापूर
22 कॅरेट सोनं - 7,730 रुपये
24 कॅरेट सोनं - 8,433 रुपये
वसई-विरार
22 कॅरेट सोनं - 7,733 रुपये
24 कॅरेट सोनं - 8,436 रुपये
छत्रपती संभाजी नगर
22 कॅरेट सोनं - 7,730 रुपये
24 कॅरेट सोनं - 8,433 रुपये
कोल्हापूर
22 कॅरेट सोनं - 7,730 रुपये
24 कॅरेट सोनं - 8,433 रुपये
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.