Gold Price Surges saam tv
बिझनेस

Gold Rate Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं महागलं; सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही, पाहा!

Today's Gold Price: गेल्या काही काळापासून सोन्याच्या दरामध्ये चढ-उतार पाहायला मिळतोय. आजच्या दिवशी सोन्याचे भाव काही प्रमाणात वाढले आहेत. अशावेळी सोन्यामध्ये गुंतवणूक करावी का हे देखील जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीचा आलेख वाढताना दिसतोय. आजच्या दिवशी म्हणजेच ५ मे रोजी देखील सोन्याचा भाव वाढला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या एका आठवड्यात सोन्याच्या किमतीत ३,५०० रुपयांची घसरण झालीये. मनी कंट्रोल वेबसाईटच्या माहितीनुसार, आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी २२ कॅरेट सोन्याची किंमत ८७,७५० रुपये आहे आणि २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ९५,८०० रुपयांच्या आसपास आहे.

सोन्यामध्ये आता गुंतवणूक करावी का?

२२ एप्रिल रोजी सोन्याचा भाव १,००,००० रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर पोहोचला तेव्हा तो त्याच्या सर्वोच्च किमतीवर होता. मात्र तेव्हापासून सोन्याची किंमत काही प्रमाणात घसरताना दिसतेय. आता सोन्याची किंमत सुमारे ९५,००० रुपयांपर्यंत आहे.

अशावेळी अनेकांना प्रश्न पडत आहे की सोन्यात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे का? तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, जर तुम्हाला दीर्घ काळासाठी गुंतवणूक करायची असेल तर ही घसरण चांगली संधी असू शकते. परंतु कमी काळासाठी खरेदी करणाऱ्यांनी थोडी सावधगिरी बाळगावी.

दिल्ली मुंबईमध्ये काय आहे भाव?

सोमवार ५ मे २०२५ रोजी दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ८७,९०० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव ९५,८८० रुपये प्रति १० ग्रॅम होता. तर मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव ८७,७५० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव ९५,७३० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.

आजचा चांदीचा भाव

सोमवार ५ मे २०२५ रोजी चांदीची किंमत ९७००० रुपये प्रति किलो आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत चांदीच्या किमतीत १,००० रुपयांची घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय.

२४ कॅरेट सोन्याचा दर

  • दिल्ली-९५,८८०

  • चेन्नई-९५,७३०

  • मुंबई-९५,७३०

  • कोलकाता-९५,७३०

  • जयपूर-९५,८८०

  • नोएडा-९५,८८०

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT