Gold Rate Today saam tv
बिझनेस

Gold Rate Today: अक्षय्य तृतीयेच्या एक दिवस आधी सोनं महागलं; खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today: उद्या अक्षय्य तृतीया आहे. अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बरेचजण सोनं खरेदीचा विचार करतील. मात्र अक्षय्य तृतीयेच्या एक दिवस अगोदर सोन्याची किमतीत वाढ झाली आहे. काय आहे आजचा सोन्याचा भाव पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

Gold Rate on Akshaya Tritiya: उद्या अक्षय्य तृतीया आहे. सोनं खरेदी करण्यासाठी उद्याचा दिवस शुभ मानला जातो. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत घसरण होत होती. मात्र अक्षय्य तृतीयेच्या एक दिवस पूर्वी सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. ३० एप्रिल रोजी संपूर्ण देशात अक्षय्य तृतीया साजरी केली जाणारे.

२२ एप्रिल रोजी सोन्याच्या किमती १,००,००० रुपयांच्या वर पोहोचल्या होत्या. तर आज मंगळवार २९ एप्रिल रोजी सोन्याचा भाव कालच्या तुलनेत ४०० रुपयांनी महाग झाला आहे. मनी कंट्रोल वेबसाईटच्या माहितीनुसार, २२ कॅरेट सोन्याची किंमत ८९,८०० रुपये आणि २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ९७,९०० रुपये आहे. चांदीचा भाव १ लाख रुपयांच्या वर आहे.

काय आहे चांदीचा भाव?

२९ एप्रिल २०२५ रोजी म्हणजे आज चांदीचा भाव १,००,५०० रुपये प्रति किलो आहे. कालच्या तुलनेत आज चांदी ४०० रुपयांनी स्वस्त झाली आहे. प्रमुख शहरांमध्ये काय आहे सोन्याचा भाव पाहूयात.

दिल्ली-मुंबईत सोनं चांदीचा भाव

आजच्या दिवशी दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ८९,९५० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव ९७,९७० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव ८९,८०० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव ९७,९७० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. सोमवारच्या तुलनेत सोनं महागल्यामुळे उद्याची परिस्थिती कशी असेल यामुळे ग्राहक चिंतेत आहेत.

२२ कॅरेट सोन्याचा दर

  • दिल्ली-८९,९५०

  • चेन्नई-८९,८००

  • मुंबई-८९,८००

  • कोलकाता-८९,८००

  • जयपूर-८९,९५०

  • नोएडा-८९,९५०

२४ कॅरेट सोन्याचा दर

  • दिल्ली-९८,१२०

  • चेन्नई-९७,९७०

  • मुंबई-९७,९७०

  • कोलकाता-९७,९७०

  • जयपूर-९८,१२०

  • नोएडा-९८,१२०

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

SCROLL FOR NEXT